स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे आपण स्वतंत्र भारतात स्वाभिमानाने जगत आहोत :सुशिलकुमार शिंदे
जात पात धर्म न पाहता देशासाठी “स्वातंत्र्य सैनिक ज्या प्रमाणे लढले त्याच प्रमाणे लढायची वेळ आली आहे:खा.प्रणिती शिंदे
सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, सोलापूरचे चार हुतात्मे मल्लपा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे व किसन सारडा यांना स्वातंत्र्यपूर्व काळात १९३१ मध्ये स्वातंत्र्याची लढाई इंग्रजांविरुद्ध लढताना १२ जानेवारी या दिवशी फाशी देण्यात आली. त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी, आणि हुतात्मा दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, खासदार प्रणिती शिंदे, यांच्या हस्ते शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, १२ जानेवारी आजच्याच दिवशी येरवडा जेल मध्ये सोलापूरच्या चार हुतात्म्यांना फाशी देण्यात आली. त्यानिमित्त आज त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सोलापूरच्या चार हुतात्म्यांसह हजारो वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, कुटुंबाचा त्याग केला, आणि गुलामगिरीच्या बेड्यांतून देशाला मुक्त करण्यासाठी कठोर संघर्ष केला. स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान केले म्हणून आज आपण स्वतंत्र भारतात स्वाभिमानाने जगतो. स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे महत्त्व जाणून आपण त्यांचे स्वप्न साकार करणे ही आपली जबाबदारी आहे.
यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की, सोलापूर हे चार हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. चार हुतात्मे वेगवेगळ्या धर्माचे होते. जात पात धर्म न पाहता त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यांना वंदन, पण आज देशात जी परिस्थिती आहे आपण नेमके काय करत आहोत याची विचार करायची वेळ आली आहे आज देश पुढे जातो की मागे हा प्रश्न मनात निर्माण होत आहे. ज्याप्रमाणे जात पात धर्म न पाहता देशाच्या स्वातंत्र्यासाठी “स्वातंत्र्य सैनिक ज्या प्रमाणे लढले त्याच प्रमाणे लढायची वेळ आली आहे. तेव्हाच देश पुढे जाईल.
या अभिवादन कार्यक्रमास माजी आमदार विश्वनाथ चाकोते, प्रदेश चिटणीस संजय हेमगड्डी, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, मा नगरसेवक विनोद भोसले, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जुबेर कुरेशी, प्रवक्ते नागनाथ कदम, भीमाशंकर टेकाळे, सुशील बंदपट्टे, तिरूपती परकीपंडला, अशोक कलशेट्टी, अनिल मस्के, केशव इंगळे, बसवराज म्हेत्रे, रुपेश गायकवाड, परशुराम सतारेवाले, लखन गायकवाड, राजन कामत, इलियास शेख, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, राजेश झंपले, सुमन जाधव, नागनाथ शावने, अप्पा सलगर, पृथ्वीराज नरोटे, शोभा बोबे, शुभांगी लिंगराज, मुमताज तांबोळी, चंदा काळे, छाया हीरवटे, हणमंतू रुपणर, रुकैया बिराजदार, लता गूंडला, मोहसीन फुलारी, सायमन गट्टू, मशाक मुल्ला, इब्राहीम कलबुर्गी, आश्र्विनी सोलापूरे, मुध्दसर बिराजदार, विश्वास गज्जम, जबार शेख, आदम शेख, रेवणसिद्ध खंडोजी, जाहेद शेख, सौद शेख, अभिलाष अच्युगटला, सोमनाथ व्हटकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.