
दत्तकला शिक्षण संस्थेच्या वतीने ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संस्थेअंतर्गत फार्मसी, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, अशा विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या सचिव सौ. माया झोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजच्या डिजिटल युगात सोशल मिडिया आणि इंटरनेटपासून थोडा वेळ दूर राहून मैदानी खेळ खेळणे हे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मैदानी खेळामध्ये सहभाग घेतल्याने एकाग्रता, सहकार्य व नेतृत्वगुण विकसित होतात.”
या दिवशी विद्यार्थ्यांसाठी खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, लेझीम, करम, बुद्धिबळ, क्रिकेट यांसारख्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी या स्पर्धांमध्ये उत्साहपूर्वक सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडाशिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेचे प्राचार्य, शिक्षकवृंद, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
