
‘दत्तकला औषधनिर्माण महाविद्यालयाच्या’ ६७ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड
येथील दत्तकला इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या ६७ विद्यार्थ्यांची नुकतीच पूल कॅम्पस ड्राइव्ह २०२५ माध्यमातून औषधनिर्माण मधील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे.
दत्तकला शैक्षणिक संकुलामध्ये ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलच्या वतीने ‘पूल कॅम्पस ड्राइव्ह २०२५’ चे आयोजन केले होते. यामध्ये दत्तकला फार्मसीच्या अंतिम वर्षातील १२८ तसेच इतर परिसरातील औषधनिर्माण महाविद्यालयातील ९२ असे एकूण २२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी माईडवर्क्स प्रायव्हेट लिमिटेड, आणि टेककेअर मेडिकल सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये फार्मसी महाविद्यालयातील अंतिम वर्षातील ६७ व इतर महाविद्यालयातील ५६ विद्यार्थ्यांची कंपनीद्वारे नोकरीसाठी निवड झाल्याची माहिती दत्तकला शिक्षण संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर व दत्तकला इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या प्राचार्या डॉ. ज्योती जावळे यांनी दिली. माईडवर्क्सचे संस्थापक व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. संग्राम पवार व कमल कुमार यांनी निवड प्रक्रिया पूर्ण केली. विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा, तोंडी मुलाखत, ग्रुप डिस्कशन आणि तांत्रिक कौशल्य चाचण्या यांच्या आधारे करण्यात आली.
ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. जितेंद्र कंदले व डॉ. हरिबा जेडगे, डॉ. आशिष जाधव यांनी कॅम्पस ड्राइव्हच्या नियोजनासाठी विशेष प्रयत्न केले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, हा उपक्रम यशस्वी ठरल्याबद्दल महाविद्यालयाकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा.रामदास झोळ व सचिव सौ. माया झोळ यांनी संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.