भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकर नाना वाघमारे यांची पोखरापूर जिल्हा परिषद गटात जोरदार तयारी सुरू !
(खासदार धनंजय महाडिक, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राजन पाटील यशवंत तात्या माने, विश्वराज भैय्या महाडिक, जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांची राहणार शंकर नानां वर कृपादृष्टी)
(सौंदणेचे सरपंच पद , मोहोळ पंचायत समिती सदस्य याचबरोबर भाजपाशी एकनिष्ठ असलेले शंकर नाना वाघमारे यांचेच या गटात पारडे जड)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
मोहोळ तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या व सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या जिल्हा परिषद गटामध्ये पोखरापूर जिल्हा परिषद गटाची सर्वाधिक चर्चा असून या गटामध्ये माजी पंचायत समिती सदस्य तसेच सौंदणे चे सरपंच राहिलेले तचेच भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकर नाना वाघमारे यांचे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे..
श्री शंकरराव वाघमारे मागील झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये टाकळी सिकंदर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली होती त्यावेळी थोड्या मताने त्यांचा या ठिकाणी पराभव झाला होता.. शंकर नाना वाघमारे हे भाजपचे सतत एकनिष्ठ असे प्रमुख कार्यकर्ते असून त्यांचा संपूर्ण मोहोळ तालुक्यात मोठा जनसंपर्क असून येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ते पोखरापूर जिल्हा परिषद गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पोखरापूर जिल्हा परिषद गट हा दोन पंचायत समिती गणामध्ये विभागला गेला असून या गटात सतरा गावांचा समावेश करण्यात आला आहे..
पोखरापूर पंचायत समिती गणामध्ये पोखरापुर , खवणी, कोन्हेरी, यावली, चिखली, हिवरे, वडाचीवाडी, पासलेवाडी, बिटले आणि गलंदवाडी दहा गावांचा समावेश आहे..
सय्यद वरवडे गणामध्ये सौंदणे, तांबोळे, सय्यद वरवडे, ढोक बाभुळगाव, वडवळ,नजिंक पिंपरी,रामहिंगणी, अशी गावे आहेत..
या दोन्हीही पंचायत समिती गणामध्ये भारतीय जनता पार्टीची चांगली ताकद असून नुकताच माजी आमदार राजन मालक पाटील व यशवंत तात्या माने, यांनी त्यांच्या हजारो समर्थका सह भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे इथे भाजपची मोठी ताकद शंकरराव वाघमारे यांना मिळणार आहे.. त्याचबरोबर भीमा परिवाराचे सर्वेसर्वा खासदार धनंजय महाडिक यांची या गटातील अनेक गावात मोठी ताकद असून भीमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये येथील बरीचशी गावे येत आहेत त्यामुळे तेथूनही शंकर वाघमारे यांना मोठी मदत मिळू शकते…
पक्षाचा सामान्य कार्यकर्ता ते तालुका अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, संपूर्ण जिल्हाचा जिल्हाध्यक्ष , प्रदेश कार्यकारिणी सदस्य, राज्य परिषद सदस्य , किसान मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष आदी पदावर त्यांनी काम केले आहे , तसेच पक्षाने त्यांच्यावर अनेकदा नगरपंचायत , विधान परिषद , विधान सभा, लोकसभा आदी निवडणुकीत प्रभारी , निवडणूक प्रमुख अशी जबाबदारी त्यांनी यशस्वी पने पार पाडली आहे . शांत, संयमी व संघटन कौशल्य असलेल्या वाघमारे यांनी 38 वर्षापासून सतत पक्षाशी असलेली नाळ , पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबरोबर असणारे त्यांचे संबंध, शशिकांत नाना चव्हाण यांचे त्यांच्यावर असणारे प्रेम व खासदार धनंजय महाडिक , राजन मालक पाटील व यशवंत तात्या माने, यांच्याशी असणारा त्यांचा जिव्हाळा यामुळेच, नानांना नक्कीच या निवडणुकीमध्ये मोठी संधी प्राप्त होणार आहे. या सर्वांच्याच अनुषंगाने शंकर नाना वाघमारे यांचे पारडे या निवडणुकीमध्ये जड दिसत असून, चांगल्या पद्धतीने मोर्चे बांधणी केल्यास निश्चितच मोठया मताधिक्याने शंकर नाना वाघमारे यांचा विजय पोखरापूर जिल्हा परिषद गटामध्ये निश्चित होणार आहे…
