भैरवनाथ शुगरचा पहिला हप्ता २८०० प्रमाणे जमा:चेअरमन मा. प्रा. शिवाजीराव सावंत
भैरवनाथ शुगर वर्क्स लि., युनिट नं.३, लवंगी, या कारखान्याने चालु गळीत हंगाम २०२४-२५ मधील १५ डिसेंबर पर्यन्तचे उसाचे बिल प्रति मे. टन २८०० रु. प्रमाणे शेतकरी उस उत्पादकांच्या खात्यात जमा केल्याची माहिती भैरवनाथ शुगरचे चेअरमन मा. प्रा. शिवाजीराव सावंत यांनी दिली.
भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे संस्थापक मा.ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब (माजी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या नेतृत्वाखाली व चेअरमन मा.प्रा.शिवाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली २०२४-२५ च्या चालू हंगामातील गाळप सुरू झाले असून शेतकर्यांना पहिली उचल २८०० प्रती मे.टन दिली जाणार आहे. शेतकर्यांचा सर्व ऊस गाळपासाठी प्रोग्रामप्रमाणे नेला जाणार असून चांगल्या प्रतिचा ऊस पुरवठा कारखाण्यास करावा असे आवाहनही भैरवनाथ शुगरचे चेअरमन मा.प्रा.शिवाजीराव सावंत यांनी केले. तसेच एफआरपी पेक्षा जास्त दर आता पर्यन्त दिलेला आहे. शेतकर्यांनी आजपर्यंत दाखवलेल्या विश्वासावरच भैरवनाथ शुगरचे विक्रमी गाळप होईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा. अनिल (दादा) सावंत, जनरल मँनेजर बाळासाहेब शिंदे व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. पुढे बोलताना मा. अनिल (दादा) सावंत म्हणाले की भैरवनाथ शुगरने सुरुवातीपासुन ऊस उत्पादकांशी असलेली बांधीलकी कायम ठेवत शेतकर्यांचे हित लक्षात घेता व दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी ऊस उत्पादकांना दिलासा देण्याचे काम भैरवनाथ शुगर ने केले आहे. तसेच सर्व शेतकरी बांधवांनी भैरवनाथ शुगरला जास्तीत जास्त ऊस देऊन सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.