“आरोग्याजी वारी पंढरीच्या दारी”कार्यक्रमात संचालक धनंजय काळे यांनी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांचे केले स्वागत!
(स्वच्छता मोहिमेत राबवला महत्त्वपूर्ण सहभाग)
तीर्थक्षेत्र दक्षिणकाशी असणाऱ्या पंढरपूर येथे भरणाऱ्या आषाढी यात्रा 2024 साठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने भरवण्यात येणाऱ्या “आरोग्याची वारी पंढरीच्या दारी”
या आरोग्य शिबिरास आज दिनांक 14 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे कणखर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे भेट देणार असून यासाठी शासन स्तरावरील सर्व तयारी पूर्ण झाली असून यामध्ये महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी पंढरपूर येथे भरणाऱ्या सर्व आरोग्य शिबिर स्थळाची आज पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासोबत प्रा. शिवाजीराव सावंत सर, अमोल बापू शिंदे विठ्ठलचे संचालक धनंजयजी काळे, बालाजी बागाल यासोबत सोलापूर जिल्हा शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
त्यांच्या या दौऱ्यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक धनंजय काळे यांनी या महत्वपूर्ण स्वच्छतेच्या कार्यक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवला असून त्यांनी हातात झाडू घेऊन झाडू संतांचे मार्ग करू पंढरीचा स्वर्ग या व्यक्तीप्रमाणे स्वच्छता मोहीम राबवली असून या त्यांच्या या उपक्रमाबाबत त्यांच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
चारी ठिकाणी भेटी दिल्यानंतर आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत व शिवाजीराव सावंत सर यांनी सर्व प्रशासकीय व आरोग्य अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या व होणारे शिबिर व्यवस्थित पार पाडावे अशी यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.