अनगरकरांना मोहोळ तालुक्याची एवढीच जर एर्लजी असेल तर अनगर हे गाव माढा तालुक्यातील समाविष्ट करावे:पवन (भैय्या) महाडिक
अनगर येथील अप्पर तहसील रद्द करण्याबाबत भीमा परिवाराचे नेते पवन (भैय्या) महाडिक यांचा उपोषणकर्त्यांना पाठींबा!
मोहोळ तालुक्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही:पवन (भैय्या) महाडिक
मोहोळ तालुक्यातील अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याबाबत मोहोळ बचाव संघर्ष समीतीच्या वतीने गेल्या 6 दिवसांपासून अमरण उपोषणाच्या माध्यमातून लढा सुरू आहे.
अनगर येथे नेहण्यात आलेले अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यात यावे यासाठी सर्व अनेक नेतेमंडळींनी या उपोषणकर्त्यांना पाठींबा दिलेला आहे.
विशेषतः या लढ्यात राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचा देखील सहभाग असल्याने महाडिक परिवारातील एक सदस्य म्हणून युवा नेते पवन (भैय्या) यांनी मोहोळ बचाव संघर्ष समितील उपोषतकर्त्यांना पाठींबा दिला आहे.
अनगरकरांना मोहोळ तालुक्याची एवढीच जर एर्लजी असेल तर अनगर हे गाव माढा तालुक्यातील समाविष्ट करावे भौगोलिक दृष्टीकोनातून मोहोळचे तहसील कार्यालय हे मोहोळ येथे रहावे यासाठी हा लढा सुरू आहे याचा फायदा तालुक्यातील जनतेला होणार आहे. वास्तविक पाहता हे अप्पर तहसील कार्यालय कामती किंवा कुरूल या ठिकाणी होणे गरजेचे आहे.तसे न होता शासनाची दिशाभूल करीत अनगरकरांनी अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाल्याने हा संपूर्ण मोहोळ तालुक्यावर अन्याय आहे हे अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यात यावे यासाठी लढ्यात आम्ही सुध्दा सहभागी आहोत तसेच अनगरचे अप्पर तहसील कार्यालय रद्द व्हावे यासाठी प्रयत्न करणार असून मोहोळ तालुक्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही असा विश्वास उपोषणकर्त्यांना पवन (भैय्या) महाडिक दिला.
यावेळी प्रभाकर भैया देशमुख, बालासाहेब गायकवाड, गणेश चव्हाण, लियाखत भय, समाधान गाडे, महेश चव्हाण, प्रदीप परांदे, समाधान साठे, पांडुरंग नागटिळक, प्रकाश मोरे, तुकाराम माने आदी उपस्थित होते.