अमेरिका येथे होणाऱ्या अंतरराष्ट्रीय विमा परिषदेत सहभागी होणार:सागर उरवणे
MDTR USA हा विमा क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे हा पुरस्कार जगातील एकूण विमा प्रतिनिधी पैकी फक्त एक टक्के विमा प्रतिनिधी मिळवू शकतात हा पुरस्कार सागर उरवणे यांनी सलग तीन वर्षे मिळवलेला आहे मागील २१ वर्षापासून सागर उरवणे यांनी ग्राहकांना विनम्र व तत्पर सेवा देत आत्तापर्यंत जवळपास दोन हजार ग्राहकांना विम्याचे छत्र प्रदान केलेले आहे येणाऱ्या जून महिन्यात अमेरिका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमा परिषदेत ते सहभागी होणार आहेत अशी माहिती त्यांनी दिलेली आहे हा पुरस्कार मिळवण्यासाठी त्यांना त्यांचे विकास अधिकारी माननीय श्री निकम साहेब LIC अकलूज शाखेचे शाखाधिकारी अनोकार साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व या पुरस्काराबद्दल LIC पंढरपूर शाखेचे शाखाधिकारी श्री गुळवणी साहेब यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.