*अखेर भगिरथदादा भालके यांचे ठरले!*
*(जनतेची विकास कामे करण्यासाठी सत्ताधारी पक्षासोबत राहणे महत्त्वाचे:-भगिरथ दादा भालके)*
(तानाजी सावंत साहेबांनी आम्हाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे:- अनिल दादा सावंत)
(मी मागच्या दाराने जाऊन आमदार होणाऱ्यातला गडी नाही:-भगिरथ दादा भालके)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्वर्गीय भारत नाना भालके यांचे , चिरंजीव व विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ दादा भालके व माजी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांचे पुतणे, अनिल दादा सावंत हे येत्या 12 एप्रिल रोजी शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश करणार असून आज त्यांनी पंढरपूर येथील त्यांच्या सांगोला रस्त्या जवळील निवासस्थानी सर्व आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये सर्व समर्थक व कार्यकर्त्यांनी दादा तुम्ही जो निर्णय घेतात त्याच्या पाठीमागे आम्ही निश्चितच उभे राहू विकास कामांसाठी व पंढरपूर शहराच्या विकासासाठी जर निधी आणायचा असेल तर आपल्याला सत्ताधारी पक्षासोबत राहावे लागेल नाहीतर विरोधी पक्षातील नेते मंडळी सुद्धा आपल्याला काहीही विकास करू देणार नाहीत ज्या पद्धतीने शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने पंढरपूरचा ठीक आहे ना काही भरीव विकास निधी देण्यासाठी प्रयत्न करत असतात म्हणूनच आपण या सत्ताधारी शिवसेना पक्षाबरोबर जावे मागे 2004 ला सुद्धा स्वर्गीय भारत नाना भालके यांनी सुद्धा अशीच भूमिका घेऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता आता आपण पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश करावा व पंढरपूरच्या विकासाला हातभार लावावा अशी मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ भाऊ अभंगराव यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले..
पंढरपूर शहर व तालुक्यातून आलेल्या तमाम समर्थकांनी स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या या निर्णयाला जोरदार पाठिंबा दिला.!!!
यावेळी या बैठकी प्रसंगी भगिरथ दादा भालके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की २०२९ ची, विधानसभा निवडणूक लांब आहे अजून तीन ते साडेतीन वर्षांमध्ये फुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे. ज्यांना माझ्या प्रवेशाची काळजी लागली आहे किंवा जे म्हणत आहेत भाजप व शिवसेना हे एकत्र आहेत तर २०२९ झाली, कशी काय उमेदवारी मिळणार उमेदवारी कशी आणायची काय आणायची आणि कशा पद्धतीने आणायची हे आमच्या आम्ही आता बघू तुम्ही त्याची आता काळजी करायची काही गरज नाही असेही यावेळी आपल्या भाषणातून भगीरथ भालके यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले..
यावेळी भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल दादा सावंत यांनीही आम्ही व आमचा संपूर्ण परिवार व माजी. आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब ही संपूर्णपणे भगिरथ दादा भालके यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असून, आम्ही सर्वजण त्यांच्या या निर्णया सोबतच राहणार असून काहीही अडचण आली तर आमचे चुलते, तानाजीराव सावंत साहेब हे नक्की आम्हाला मदत करणार आहेत असा ठाम विश्वास यावेळी अनिल दादा सावंत यांनी यावेळी व्यक्त केला..
या बैठकीसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथभाऊ अभंगराव, मनसे,नेते दिलीप बापु धोत्रे, अनिल दादा सावंत, अनिताताई पवार, मारुती जाधव, नितीन बागल, शौकतभाई पटेल, याचबरोबर सर्व ज्येष्ठ कनिष्ठ पदाधिकारी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, व विठ्ठल परिवारावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते या बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
