आ.समाधान आवताडे यांनी केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या श्री गणपती मूर्तीचे पुजन!
(पूजेच्या दिवशीच, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेबाबत झाली उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर सविस्तर चर्चा)
आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी जात श्री गणपती मूर्तीचे पुजन केले आहे.
आमदार समाधान आवताडे हे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आहेत पोटनिवडणुकीत आमदार समाधान आवताडे निवडून आले गेल्या तीन ते चार वर्षात विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी या मतदारसंघासाठी खेचून आणला आहे. या विकास कामांच्या माध्यमातून आ.समाधान आवताडे हे भाजपा पक्षात विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात भाजपा पक्षात देखील आ.समाधान आवताडे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
सध्या आ.समाधान आवताडे हे गावोगावी भेटी गाठी घेत आगामी निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्यातच श्री गणेश उत्सव असल्याने आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी जात श्री गणपती मूर्तीचे पुजन केले आहे.