
आ. सचिन कल्याणशेट्टी यांची आमदार निवास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड
भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची आमदार निवास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रभावी नेतृत्व व कार्यक्षम व्यवस्थापनाचे प्रदर्शन केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नवी जबाबदारी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना सोपवली आहे. कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी या निवडीचे स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.