(शासकीय महापूजेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिर समितीकडून निमंत्रण!)
(सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
कार्तिकी यात्रा दरवर्षी कार्तिकी शुध्द एकादशी या दिवशी भरते. सन 2026 यावर्षी कार्तिकी यात्रा शनिवार, दिनांक 21 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी पहाटे 2.20 वाजता उपमुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्यात येणार असून, महापूजेचे निमंत्रण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज दिनांक ०४ नोव्हेंबर२०२६ रोजी मुंबई येथे मंदिर समितीकडून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), अॅड. माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, भागवतभुषण अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे तसेच नगराध्यक्ष तथा पदसिद्ध सदस्या प्रणिता भालके व कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते विणा, वारकरी पटका, श्रींची मूर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला.
