*भाजपा तालुकाध्यक्ष रमेश माने यांचा दानशूरता पुन्हा एकदा पेनुर व पंचक्रोशीत ठरला चर्चेचा विषय!
(अंबिका देवी यात्रेनिमित्त लाईट डांब मंदिराला रंगरंगोटी, मंदिर परिसर सुशोभीकरण या कामाला मोठा हातभार दिला तालुकाध्यक्ष रमेश माने यांनी)
(स्वखर्चातून पार पाडली लाखो रुपयांची मंदिर परिसरातील विकास कामे)
नेहमीच आपल्या दानशूर व कर्तुत्वाच्या नावाने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर मोहोळ तालुक्यात प्रसिद्ध असणारे मोहोळ दक्षिणचे तालुकाध्यक्ष रमेश माने यांनी पुन्हा एकदा आपल्या नावाला साजेशे असे, काम करून पेनुर येथील श्री अंबिका देवी मंदिराच्या यात्रे निमित्ताने व येणाऱ्या भावी भक्तांच्या अडचणी लक्षात घेऊन येते स्वतः स्वखर्चातून विजेचा मोठा खांब तारा ओढून मंदिर परिसर प्रकाशमान केला असून, याचबरोबर या अंबिका यात्रे निमित्ताने मंदिराच्या सर्वच परिसरामध्ये सुशोभीकरण स्वच्छता व पिण्याच्या पाण्याची भाविकांना सोय, व मंदिराला रंगरंगोटीचे मोठे, काम या निमित्ताने तालुकाध्यक्ष रमेश माने यांनी केले आहे. एकंदरीत विकास कामांमुळे कोट्यावधी रुपयांची विकास कामे केल्याची चर्चा संपूर्ण पेनुर गावाबरोबरच संपूर्ण पंचक्रोशी मध्ये पसरली असून रमेश माने यांचा हा दिलदारपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे! भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष या नात्याने त्यांनी आजपर्यंत अनेक विकास कामे या भागात व संपूर्ण पेनुर परिसरामध्ये केली असुन या कामाच्या माध्यमातून त्यांचे संपूर्ण नाव या भागामध्ये चांगल्या पद्धतीने पसरले आहे! *”गोरगरिबांच्या अडचणीला जाणारा कामाचा माणूस”* असे ब्रीदवाक्य त्यांच्या नावाभोवती जोडले गेले असून, कामाच्या माध्यमातून त्यांनी सर्वांना उत्तरे दिलेली आहेत! या कामावेळी युवा नेते रणजीत चवरे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल माने, भैरवनाथ चवरे,पत्रकार बालाजी शेळके, अजित वाघमोडे, धनाजी चवरे,आशिष शंकर, बालाजी चवरे, निहाल माने, अनिकेत माने, महेश चवरे कल्याण चवरे , रोहन चवरे , परमेश्वर चवरे आदी उपस्थित होते!
