*शपर्यावरण दिनानिमित्त पेनुर येथे वृक्षारोपण; कुस्तीपटूंचा सत्कार!
*(आमदार निरंजन जी डावखरे यांच्या शुभहस्ते नक्षत्र लॉन्स येथे वृक्षारोपण संपन्न)
(तालुकाध्यक्ष रमेश माने यांचा मोहोळ तालुक्यात प्रथमच स्तुत्य उपक्रम!)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे नक्षत्र लॉन्सजवळ मोहोळ–पंढरपूर राष्ट्रीय महामार्गालगत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. सोलापूर दौऱ्यावर असताना आमदार निरंजनजी डावखरे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन भाजप मोहोळ दक्षिण मंडळाचे तालुकाध्यक्ष रमेश माने यांनी केले होते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान पेनुर येथील युवा कुस्तीपटू रविराज धोंडीराम निंबाळकर याचा विशेष सत्कार करण्यात आला. सातारा येथे आयोजित हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत रविराज निंबाळकर याने ८५ किलो वजन गटात ऑल इंडिया चॅम्पियन ठरत सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आमदार डावखरे यांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला.
तसेच रविराजचा धाकटा भाऊ याने पुणे येथे आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ६५ किलो वजन गटात महाराष्ट्र चॅम्पियन ठरत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्याचाही सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चवरे, मोहोळ उत्तर मंडळाध्यक्ष तथा नगरसेवक सतीश काळे, सागर मास्तर चवरे, रामदास चवरे, मोहोळ उपनगराध्यक्ष दत्ता खवळे, अण्णासाहेब सलगर, अचित चवरे, मुन्ना राऊत, राजू सलगर, विशाल चौधरी, सागर भोसले, यशवंत नामदे, तानाजी माने, धनाजी वाघ, अजित वाघमोडे, दिगंबर टेकळे, प्रशांत शिंदे, मानाजी खरात, विक्रांत खरात आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनासोबतच ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.