
*कर्मयोगी इन्स्टिटयूट मध्ये “टेक्नोस्पार्क” स्पर्धा उत्सहात संपन्न.*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग, आय आय सी, आयक्यूएसी व परम एक्सेस विभागा मार्फत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी टेक्नोस्पार्क या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये मॉक इंटरव्यू व आयडिया प्रेसेंटेशन च्या स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून कम्प्युटर सायन्स विभागाचे माजी विद्यार्थी रोहित कांबळे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील व प्रमुख पाहुणे रोहित कांबळे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. अभियंता दिनाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे २८९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता अशी माहिती कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रा. दीपक भोसले यांनी दिली.
सदर स्पर्धेमध्ये आयडिया प्रेझेंटेशन स्पर्धेसाठी हरी शेळके, अक्षदा हलकुडे, अंकिता जाधव तर मॉक कॅम्पस इंटरव्यू स्पर्धेमध्ये अक्षय कोरके व सुप्रिया सुरनर या विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. प्रा.गायत्री सरदेशमुख यांनी स्पर्धेचे संयोजक म्हणून काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कम्प्युटर सायन्स विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील कर्मयोगी पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, उपप्राचार्य जे एल मुडेगावकर, रजिस्ट्रार जी डी वाळके, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. राहुल पांचाळ, विभाग प्रमुख डॉ. एस एम लंबे, डॉ. एस व्ही एकलारकर, प्रा. अनिल बाबर प्रा. दीपक भोसले तसेच इतर सर्व प्राध्यापक उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस पी पाटील यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले व स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. प्रा. दीपक भोसले यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
