
*जि प. पं. समिती निवडणूकसाठी जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांनी रणशिंग फुंकले!*
*(सर्व विभागातील कार्यकारणी जाहीर करीत उमेश दादा पाटील यांनी मारली बाजी)*
(सर्वांनी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हावे:- उमेश दादा पाटील)
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा कार्यकारिणी व विविध सेल विभागाच्या निवडीचा कार्यक्रम मोहोळ येथील सावली बंगल्यावर जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला!
या निवडी महत्त्वाच्या मानल्या जातात, याचा फायदा पक्षाला होणार आहे. असे प्रतिपादन यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केले..
या कार्यक्रमाला पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष वर्षाताई शिंदे,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष मोतीराम चव्हाण,अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष नजीर इनामदार,सामाजिक न्याय सेल जिल्हाध्यक्ष प्रशांत भालशंकर ,विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अतूल शिंदे, तौफिक शेख, संजय विभूते,युवती तालुकाध्यक्ष प्रज्ञा बनसोडे यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते व विविध सेल विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणांना बळ देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाचे स्वागत करत पक्षाच्या बळकटीकरणासाठी जोमाने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने आता पासूनच तयारी सुरू केली आहे. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव वाढवण्या साठी व जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी पक्षाने ठोस पावले उचलण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये गाव पातळीवरील समस्यांचे निराकरण, सामाजिक समावेशकता आणि विकासकामांना गती देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष पाटील यांनी सांगीतले.
*”जाहीर केलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे”*
*सागर अण्णासाहेब ताड किसान सभा जिल्हा अध्यक्ष, अण्णासाहेब अविनाश पाटील ग्रंथालय जिल्हा अध्यक्ष, सतीश कुलाल प्रवक्ता, नागेश अभिमन्यू चव्हाण जिल्हा* *सरचिटणीस, कल्पना राहुल क्षीरसागर जिल्हा सरचिटणीस, जमादार हसन खाजाभाई जिल्हा सरचिटणीस, राजश्री राजेंद्र ताड जिल्हा उपाध्यक्ष युवती, प्रवीण बाजीराव शिंदे जिल्हा अध्यक्ष शिक्षक सेल, गणेश अर्जुन पवार असंघटित कामगार कक्ष तालुका प्रमुख मोहोळ, प्रसाद अशोक वस्त्रे आध्यात्मिक कक्ष तालुका समन्वयक मोहोळ, बापू महादेव वाघमोडे ओ.बी.सी. विभाग जिल्हा उपाध्यक्ष ,नितीन निळे ओ.बी.सी. विभाग तालुका प्रमुख, सचिन दिनकर जांभळे ओ.बी.सी. विभाग उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष, सुनील गोपीनाथ जाडकर ओबीसी विभाग बार्शी तालुकाध्यक्ष, फुलचंद निवृत्ती सरवदे सामाजिक न्याय विभाग मोहोळ तालुकाध्यक्ष,*
जोगेंद्र मधुकर गायकवाड सामाजिक न्याय विभाग मोहोळ, तालुका कार्याध्यक्ष, अजिंक्य बंडू उन्हाळे युवा विभाग जिल्हा उपाध्यक्ष, अजिंक्य अशोक क्षीरसागर युवक विभाग युवक विभाग मोहोळ तालुकाध्यक्ष, मयूर पांडुरंग गोरे उत्तर सोलापूर तालुका कार्याध्यक्ष, राज रेवणसिद्ध कापसे विद्यार्थी विभाग मोहोळ तालुका अध्यक्ष, ऋषिकेश अर्जुन कोळी मोहोळ तालुका विधानसभा अध्यक्ष विद्यार्थी आघाडी,गौरी अनिल शिंदे मुली विभाग जिल्हा सरचिटणीस, नामदेव शिवाजी हाके सोशल मीडिया विभाग जिल्हा उपाध्यक्ष, बाबासाहेब हरिदास मोटे सोशल मीडिया विभाग, पंकज दत्तात्रय जाधव सोशल मीडिया विभाग माळशिरस, अन्वर अमीन शेख अल्पसंख्याक विभाग उत्तर सोलापूर, समर्थ राम चौधरी हिंदी भाषिक सेल तालुकाध्यक्ष मोहोळ. आदी सर्व पदाधिकारीची निवड जिल्ह्याध्यक्ष उमेश दादा पाटील यांनी केली आहे.
