
पेनुर येथील विविध रस्त्यांच्या काँक्रिटी करण्याच्या कामाला सुरुवात!
(शिवसेना जिल्हाप्रमुख चरण राज चवरे यांच्या जिल्हा नियोजन निधीतून पेनुर येथे १५ लाख रुपयाच्या कामाची सुरुवात)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मोहोळ तालुक्यातील पेनुर येथील डी एस टेलर ते माने चावडी वस्ती व माने चवडे ते मशीद या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाची अखेर सोलापूर जिल्ह्याचे धडाकेबाज जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जवळजवळ १५ लाख रुपयांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाची सुरुवात झाली असून यामुळे सदरील वाड्या वस्तीवरील सर्व नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. हा सर्व निधी सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, यांच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून मिळाला असून हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी जिल्हाप्रमुख चरण राज चवरे यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे.
अनेकांनी केलेल्या टीकेला कामातून दिलेले उत्तर म्हणून चरण राज चवरे यांच्याकडून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी देवानंद रणदिवे सर, सरपंच सुजित आवारे, सचिन राऊत, बाळू नाना भोसले, दत्तात्रय अण्णा शेंबडे, सोमनाथ परीट, चिंतामणी माने मा. उपसरपंच प्रकाश गवळी, ग्रामपंचायत सदस्य सज्जू शेख, मोहम्मद पटेल, अनिल राजगुरू, अमोल चवरे, महादेव चव्हाण, डीएस टेलर, धनाजी खराटे, अविनाश क्षिरसागर, प्रवीण पवार, अक्षय सावंत, तेजस चवरे, आशिष शंकर, गणेश पवार, स्वप्निल डोंगरे, याचबरोबर पेनुर गावातील असंख्य शिवसैनिक व कार्यकर्ते या काँक्रीटी करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते..
*कोट*
*सातत्याने विरोधकांनी केलेल्या टीकेला आम्ही आमच्या विकास कामाच्या माध्यमातून सर्वांना चोख प्रतिउत्तर दिले असून, आगामी दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये पेनुर जिल्हा परिषद गटातील सर्व विकास कामे पूर्णत्वास नेऊन पेनुर जिल्हा परिषद गटाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही!*
*चरणराज चवरे*
*शिवसेना जिल्हाप्रमुख सोलापूर*
