
न्यु सातारा पॉलिटेक्निक कोर्टी येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन’ उत्साहात साजरा
स्वतंत्र भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन न्यु सातारा पॉलिटेक्निक कोर्टी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजाराम ( नाना) महादेव निकम यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षक्केत्तर कर्मचार्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा कळविल्या. प्रथमतः उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच राष्ट्रगीत व झेंडागीत विद्यार्थ्यांकडून म्हणण्यात आले व सर्व उपस्थित पाहुण्यांचे संस्था व विद्यार्थ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. मनोज भायगुडे (नेत्ररोगतज्ञ मंगलज्योती नेत्रालय, पंढरपूर) , मा.शार्दुल शरद नलविलवार (तिरुपती कन्स्ट्रक्शन पंढरपूर) , मा. आनंदराव वरे (संचालक न्यु सातारा समूह), मा. श्री. डॉ. लक्ष्मीकांत निकम (संचालक ,न्यु सातारा समूह ) मा . श्री.बाबासाहेब जाधव (उद्योगपती ,न्यु सातारा समूह) मा. श्री. महेश येडगे (माजी उपसरपंच कोर्टी ),मा.श्री.प्राचार्य विक्रम लोंढे, मा.श्री.प्राचार्य डॉ. एन. एन. तंटक(बीसीए) ,संस्था प्रतिनिधी मा. श्री. ज्ञानेश्वर शेडगे, टी. पी. ओ.व उपप्राचार्य विशाल बाड, सर्व विभाग प्रमुख, सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थित पाहुण्यांचा सत्कार मा.बाबासाहेब जाधव व आनंद राव वरे यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राचार्य विक्रम लोंढे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात महाविद्यालाच्या प्रगतीचा अहवाल सर्वांसमोर मांडत असताना जगामध्ये सर्वात जास्त तरुण पिढींची संख्या हि भारत देशात उल्लेखनीय आहे त्यामुळे भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे असे मत व्यक्त केले व सर्व उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री. मनोज भायगुडे यांनी भारताला बलशाली बनवण्यासाठी एकजुटीने व कठोर प्रयत्न करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले व उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच श्री शार्दुल नलविलवार यांच्याकडून प्लास्टिक व त्याचे पर्यावरणावर होणारे घातक परिणाम याविषयीचे मोलाचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली व त्यांच्याकडूनही विद्यार्थ्यांना उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन पुरी, प्रा. बिपिन कुलकर्णी यांनी केले.
