उन्हाळी सोयाबीन बियाणाचा बिजोत्पादन कार्यक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर दि.22:-राज्यात बहुतांश जिल्ह्यात झालेला सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे खरीप 2021 हंगामात शेतकऱ्यामार्फत राबवलेले सोयाबीन बिजोत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणात बाधित झालेले आहे. त्यामुळे खरीप 2022 हंगामाकरिता राज्याची सोयाबीन प्रमाणित बियाण्याची गरज विचारात घेवून, शासनाचे निर्देशानुसार महाबीजद्वारे उन्हाळी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यामार्फत त्रृटीपुर्ती सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे.

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मार्फत बिजोत्पादन कार्यक्रम आयोजित करण्यात येते. त्या अनुषंगाने उन्हाळी 2021-22 हंगामात सोयाबीन वाण फुले संगम,एम.ए.यु.एस-71, एम.ए.यु.एस-158 वाणासाठी प्रती एकर 100/-रुपये प्रमाणे आरक्षण सुरु झाले आहे. राज्याची बियाणे पुर्तता करण्याचे दृष्टिने महामंडळाने उन्हाळी 2021-22 हंगामामध्ये सोयाबीन सोयाबीन पिकामध्ये प्रमाणित दर्जाचे बिजोत्पादन कार्यक्रम राबवित आहे. सदर नियोजीत बिजोत्पादन कार्यक्रम हा उन्हाळी 2021-22 उन्हाळी हंगामात 30 नोव्हेंबर2021 पुर्वी राबवावयाचा असून इच्छुक बिजोत्पादकांनी बिजोत्पादन कार्यक्रम स्त्रोत बियाणे, स्त्रोत बियाणे किंमत , उन्हाळी हंगामातील महामंडळाचे सोयाबीन बिजोत्पादनाचे खरेदी धोरण इ. विषयी याबाबत अधिक माहितीसाठी जिल्ह्याचे महाबीज कार्यालयाशी संपर्क साधावा 0217-2327069, 8669642791, तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. जिल्हा कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here