सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी भारतीय जनता पार्टी चे सदस्य व्हावे: जिल्हा उपाध्यक्ष लिंगराज शेंडगे
खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली व चेअरमन विश्वराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व युवकांना सोबत घेऊन भाजपाची सदस्य संख्या वाढवणार:जिल्हा उपाध्यक्ष लिंगराज शेंडगे
गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मोठा विजय संपादन केला विकासात्मक दृष्टीकोन असल्याने देशात मोठ्या प्रमाणावर विकास केला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा देशात नव्हे तर जगभरातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून मानला जात आहे.त्याच अनुषंगाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये अनेक विकासात्मक ऐतिहासिक बदल घडवून आणले आहेत.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देशातील युवकांना भारतीय जनता पक्षात सदस्य व्हावे असे आवाहन केले होते. त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने सदस्यता अभियान सुरू केले आहे.
खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली व चेअरमन विश्वराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व युवकांना सोबत घेऊन भाजपाची सदस्य संख्या वाढवणार असल्याचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष लिंगराज शेंडगे यांनी सांगितले आहे. तसेच पंचक्रोशीतील सर्व तरुणांनी भारतीय जनता पार्चीचे सदस्य व्हावे असे आवाहन युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष लिंगराज शेंडगे यांनी केले आहे.