भीमा गळीत हंगाम थाटात संपन्न!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

(मागील 150/-चे ऊसबील देणार)

(इथेनॉल प्रकल्प हाती घेणार.मा.खा धनंजय महाडिक)

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

टाकळी सिकंदर येथील मोहोळ ची राजकीय राजधानी समजल्या जाणा-या भीमा सहकारी साखर कारखान्याचा आज 42 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन खा.धनंजय ऊर्फ मुन्नासाहेब महाडिक व जेष्ठ ७ सभासदांच्या शुभहस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून संपन्न झाला.यावेळी कारखान्याचे सात जेष्ठ सभासद सुखदेव बापु चव्हाण, विलास श्रीमंत दाईगंडे, सज्जन साहेबराव पवार,अंकोली, चंद्रकांत आगतराव भोसले पापरी, नवनाथ वन्नाप्पा वसेकर,रामचंद्र भिमा जाधव, राजकुमार (काका) व्यवहारे,आदी सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कारखान्याचे चेअरमन संसदरत्न खा.धनंजय ऊर्फ मुन्नासाहेब महाडिक यांनी विरोधकांनी वारंवार आणलेल्या अडचणी त्यामुळे शेतकऱ्यांची ऊस बिल देण्यासाठी विलंब झाला अन्यथा आठ महिन्यापूर्वीच आपण ही बिले वाटप करू शकलो असतो व कामगारांच्या पगाराचा प्रश्नही मागेच सुटला असता याबाबत सविस्तर माहिती दिली. व त्या बाबत सर्व सभासद शेतकऱ्यांना माहिती दिली. त्याचबरोबर शेवटच्या पंधरवड्यातील बिल दिल्याशिवाय कारखाना बंद करणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. सन 2020 – 21ची एफआरपी प्रमाणे संपूर्ण ऊस बिल देण्यात यशस्वी झाल्याचे सांगत असतानाच मागील 150 रुपये प्रति टन प्रमाणे राहिलेले ऊस बिल सुद्धा देण्याची घोषणा केली.तसेच कामगारांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्यात आल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सभासदांनी टाळ्यांच्या कडकडाटाने जल्लोष केला. यावेळी बोलताना श्री. महाडिक यांनी भीमा कारखान्या मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून एक लाख लिटर क्षमतेचा ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभा करण्याचा मानस बोलून दाखवला.भीमा कारखान्याकडे नऊ हजार हेक्‍टर उसाची नोंद झाली असून सभासदांचा भिमाच्या वजनकाट्यावर पूर्ण विश्वास असून या हंगामात आठ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करून गाठायचेच असे प्रेरणादायी आवाहन श्री महाडिक यांनी यावेळी बोलताना केले.यावेळी उपस्थित सभासदांनी “आमचा ऊस फक्त
भीमालाच” अशा घोषणा दिल्या.
या कार्यक्रमाच्या वेळी टाकळी सिकंदर विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन श्री.समाधान वसेकर यांनी भीमा परिवाराचे संघटक प्रा. संग्राम चव्हाण व भीमराव वसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खा. मुन्नासाहेब महाडिक यांच्या नेतृत्वाचा स्वीकार करत भीमा परिवारामध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी विश्वराज महाडिक,विजयबाबा महाडिक, पवन (भैय्या) महाडिक, उन्हाळे दादा, नारायण जाधव, सुरेश आप्पा शिवपुजे , उत्तमराव मुळे, दत्तात्रय कदम, शिवाजीराव गुंड पाटिल, सुनील चव्हाण, नानासो पवार, सौ. शैलाताई गोडसे ,आबादेव पुजारी, संग्राम चव्हाण सर, दिगंबर बाबर, तात्या (मामा) नागटिळक, संतोष सुळे, हरिभाऊ काकडे, हरिभाऊ चवरे, अनिल गवळी, राजाराम बाबर,बापूसो चव्हाण,दादा शिंदे, सिद्रामप्पा मदने,बापुसो जाधव, बिभिषण आप्पा वाघ, नागनाथ पवार, भीमराव वसेकर, भाऊ पाटील, सुधीर भाऊ भोसले, जगन्नाथ वसेकर, अनंत चव्हाण, पांडुरंग कदम, संतोष चव्हाण, राजकुमार पाटील सर, जयंत पाटील, डॉ. लक्ष्मण किळमिसे, संदिप देवकते, पांडुरंग ताटे, भारत पाटील,किसनबापू जाधव सर्व शेतकरी सभासद, कामगार व अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट-

“चिल्लर पार्टी” च्या आरोपांनी खचू नका: मी आहे!- मा.खा. धनंजय महाडिक

कोल्हापूरचे नामदार सतेज पाटील व खासदार संजय मंडलिक यांना हाताशी धरून कोल्हापुरातील राजकीय वैराचा गैरफायदा घेत ज्या भिमा बचाव संघर्ष समितीच्या सदस्यांनी खालच्या पातळीला जाऊन खोट्या आरोपांच्या सभासदहिताच्या विरोधी विसंगत तक्रारी देण्याचा अत्यंत घृणास्पद प्रयत्न केला त्याचा सर्व सभासदांना खूप त्रास झाला.अशा मंडळींचा “चिल्लरपार्टी”असा ऊल्लेख करून खरपूस समाचार घेत या “चिल्लर पार्टी च्या आरोपांनी तुम्ही खचू नका: मी आहे”असे निक्षून सांगितले असता सभासदांनी “आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर पणे ऊभे आहोत”असे म्हणत प्रतिसाद दिला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here