नागरिकांच्या अडचणी सोडवुन विकास कामे करत राहणार:-रणजीतसिंह शिंदे
(०६ कोटी ६५ लाख रुपये रस्ते विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन)
माळशिरस तालुक्यातील माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या १४ गावांच्या अडचणी सोडवून त्यांचा विकास करण्यासाठी सातत्याने आजपर्यंत प्रयत्न केले आहेत व यापुढेही नागरिकांच्या वैयक्तिक व सामाजिक अडचणी सोडवून गावची विकास कामे मी प्रयत्नपूर्वक करतच राहणार असे ठाम प्रतिपादन रणजितसिंह शिंदे यांनी या भागातील ठिकठिकाणच्या गावात रस्ते भूमिपूजन व उद्घाटन समारंभात केले आहे.
रणजीतसिंह शिंदे यांनी माळशिरस तालुक्यातील वाफेगाव चौदा सेक्शन, जांभूळबेट, उंबरे(वे ),कोंढारपट्टा ,माळेवाडी, माळेवाडी , विठ्ठलवाडी, खळवे माळखांबी आदी मतदारसंघात समाविष्ट असलेल्या गावातून गाव भेट दौरा आयोजित केला होता. याप्रसंगी आमदार बबनदादा शिंदे यांनी २०२३-२४ अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर केलेल्या सहा कोटी ६५लाख रुपये रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. कामाचे स्वरूप व रक्कम याप्रमाणे …
वाफेगाव ते यादव वस्ती रस्ता एक कोटी रुपये, आगाशे नगर (काकाचा पत्रा) ते सेक्शन १४ पर्यंत दोन कोटी रुपये, उंबरे(वे) ते श्रीपुर तीन कोटी रुपये व विठ्ठल वाडी ते कचरेवाडी ६५ लाख रुपये… एकूण सहा कोटी ६५लाख रुपये .
या दौऱ्याप्रसंगीप महाळूंग-श्रीपुर नगरपंचायत गटनेते राहुल रेडे नगरसेवक मौला पठाण विक्रम ताटे दादासाहेब ताटे मारुती रेडे सत्यवान कारंडे, गाडे, टिल्लू इंगळे, पांडुरंग शिंदे जांभूळचे सरपंच राहुल खटके नारायण पाटील सुमित भोसले माऊली जोरवर सचिन जोरवर रणजितसिंह मित्र मंडळाचे अध्यक्ष उंबरे (वे)चे प्रमुख नेते नवनाथ पवार सरपंच सुनील राजमाने सागर भोसले अतुल इनामदार माधव बाबर कृष्णात खटके हरिदास व्यवहारे भाऊसाहेब भांगे मनोज शेळके मारुती प्रधाने अशोक हुंबे मोहन पारसे अशोक कदम खळव्याचे सरपंच पोपटराव कदम विठ्ठलवाडी चे सरपंच अशोक घोगरे रामचंद्र कचरे उस्मान शेख सरदार शेख बांधकाम विभागाचे प्रमुख अधिकारी कास्ते त्यांचे अधिकारी व कर्मचारी व गावो गावचे नागरिक व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दौऱ्याप्रसंगी अनेक ठिकाणी वाड्या वस्त्यावर नागरिकांनी थांबवल्यामुळे प्रत्येक ठिकाणी थांबून रणजितसिंह शिंदे यांनी सत्कार स्वीकारले व नागरिकांशी संवाद साधून व चर्चा केली तसेच अडचणी समजून घेतल्या व त्या दूर करण्याचे अभिवचन दिले.