पोकळ धमक्यांना घाबरणारा मी कार्यकर्ता नाही आंदोलन तर होणारच:माऊली हळणवर
मंगळवेढा तालुक्यातील शिरशी या गावांमध्ये धनगर समाजातील एका कुटुंबावर प्राण घातक हल्ला करून तिघा चौघाला जखमी केले प्रकरणी मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे परस्पर विरोधी गुन्हे दाखल होते याप्रकरणी कुलाळ कुटुंबातील जखमीला पोलिसांनी अटक केली परंतु बाहेरगावाहून पाच पन्नास जणांनी जाऊन कुलाळ कुटुंबातील व्यक्तींना तहसीलदाराने दिलेल्या रस्ता ट्रॅक्टरने मोडत असताना असे का करता म्हणले असता बटान व उचेठाण येथील काही गावगुंडानी त्यांना प्रचंड मारहाण केली होती तरीसुद्धा पोलिसांनी एकतर्फी कारवाई करत राजकीय हस्तक्षेपामुळे आरोपींना मोकाट सोडले होते म्हणून परवा मंगळवेढा तालुक्यातील दोन तिनशे समाज बांधवांना सोबत घेऊन माऊली भाऊ हळणवर व प्रा. सुभाष मस्के सर यांनी पोलीस स्टेशन समोर आंदोलन करत निवेदन दिले होते तरीसुद्धा पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही म्हणून निवेदन देऊन पोलीस स्टेशन समोर लोकशाहीच्या मार्गाने हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन दिले आहे सदर आरोपी ने या अगोदरही उचेठाण येथे दलित समाजातील लोकांचा रस्ता मोडून अतिक्रमण करून कब्जा घेतला आहे त्याप्रकरणी या लोकांवर ऑट्रासिटी प्रमाणे गुन्हे दाखल आहेत तसेच सदरचे गुन्हेगार हे 324/ 326 पेक्षाही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले रेकॉर्ड वरचे गुन्हेगार आहेत पोलिसांची यांचे लागेबांधे असून राजकीय वर्धास्थ असल्यामुळे सदर आरोपींना अटक केली जात जात नव्हती म्हणून आम्ही सदस्य मार्गाने आंदोलन करणार असून प्रशासनाकडे न्याय मागणार आहोत याप्रकरणी काल काही लोकांनी माझ्या विरोधात निवेदन दिले असून दोन जातीत तेढ निर्माण होत असल्या प्रकरणी माझ्यावरती कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे परंतु सदर आरोपी ची पार्श्वभूमी पाहता या आरोपीने या अगोदर दलित समाजाचा रस्ता मोडला आहे व कब्जा केला आहे तसेच शिरशी येथील गरीब कुटुंबाचा ही रस्ता मोडून कब्जा केला आहे एका तरुणाला जखमी करून त्याचे फॅक्चर झाले आहे सदर जखमी दवाखान्यात ऍडमिट असून या लोकांवरती केस काढून घ्या म्हणून प्रचंड दबाव टाकत आहे त्यामुळे पोलिसांनी कारवाई करावी यासाठी आमचे हे आंदोलन असून समाजासाठी मी हे आंदोलन करणारच न्याय मिळवण्यासाठी लढणे हे माझे कर्तव्य असून हा कोणाला जातिवाद आहे असे वाटत असेल तर त्यांनी तसे समजावे मी माझ्या समाजासाठी लढतच राहणार असल्या पोकळधमक्यांना घाबरणारा माऊली हळणवर नाही याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडेही तक्रार करणार असल्याचे पुढे बोलताना त्यानी सांगितले
चौकट
संपूर्ण राज्यामध्ये मेंढपाळ बांधवावर अशाच प्रकारे हल्ले होत आहेत मंगळवेढा तालुक्यात काही राजकीय व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे धनगर समाजावर अन्याय होत असून आरोपी मोकाट असल्यामुळे पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो याप्रकरणी संपूर्ण जिल्ह्यातील समाज बांधवांनी लक्ष घातले असून धनगर समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी लढतच राहणार चळवळीतून तयार झालेला कार्यकर्ता आहे असल्या धमक्यांना घाबरणारा मी कार्यकर्ता नाही सरकारने याप्रकरणी तात्काळ लक्ष घालावे माऊली हळणवर