कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास देश पातळीवरील प्रथम पुरस्कार जाहीर!
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लि. नवी दिल्ली यांचा तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला असून सदर पुरस्काराचे वितरण ऑगस्ट 2024 मध्ये होणार आहे. पुरस्कार वितरण समारंभास देशातील मान्यवर उपस्थित राहणार असलेची माहिती कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक (मालक) यांनी दिली असून यावेळी व्हा.चेअरमन श्री.कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक (मालक) यांनी माहिती दिली की, गाळप हंगाम 2022-23 मध्ये तांत्रिक कामकाजामध्ये कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे हा पुरस्कार मिळाला आहे. कारखान्याच्या गाळप क्षमतेत वाढ, साखर उताऱ्यात वाढ, कमीत कमी लॉसेस, स्टीमचा कमीत कमी वापर, जास्तीत जास्त वीज एक्स्पोर्ट, कारखाना बंदचे प्रमाण खूपच कमी इत्यादी मध्ये उल्लेखनीय काम केल्यामुळे कारखान्यास देशपातळीवरील तांत्रीक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. कारखान्याची पुरस्कार मिळण्याची मालिका अखंडितपणे सुरू आहे. स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांनी घालून दिलेल्या तत्त्वानुसार कारखाना सुरू असून शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची, बँकांची कोणतीही देणे थक नाहीत. कारखान्याचा गळीत हंगाम 2024-25 सुरळीतपणे सुरू करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ यशवंत कुलकर्णी साहेब यांनी सांगितले की, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास प्रत्येक वर्षी देश पातळीवरील व राज्य पातळीवरील नामांकित पुरस्काराने सन्मानित केले जात असून कारखान्याच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे या अगोदर कारखान्याला महाराष्ट्रातील वनक्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा वनश्री हा पुरस्कार, राज्यातील सर्वोत्कृष्ट समजला जाणारा सहकार भूषण हा पुरस्कार सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल मिळाला आहे. तसेच देशपातळीवरील साखर उद्योगांमध्ये काम करणाऱ्या नवनवीन संस्थाकडून कारखान्यास पुरस्कार मिळाले आहेत. आज मिळालेला पुरस्कार हा कारखान्याने हंगाम 2022-23 मध्ये तांत्रिक कार्यक्षमतेमध्ये उल्लेखनीय काम केल्याने मिळाला असून कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास राज्य पातळीवरील व देशपातळीवरील 55 पुरस्काराने सन्मानीत केले असून यामध्ये प्रत्येक वर्षी वाढ पडत आहे. कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री प्रशांतराव परिचारक (मालक) व्हा. चेअरमन कैलासराव खुळे व संचालक मंडळातील सर्व सदस्य व अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्यामुळेच शक्य झाले. कारखान्याने प्रत्येक हंगामात नवनविन सुधारणा करुन अत्याधुनिक यंत्रणा उभारली असून त्याद्वारे कारखान्यास आर्थिक स्त्रोत निर्माण झाले आहेत.
यावेळी कारखान्याचे संचालक श्री.दिनकरराव मोरे, श्री.दिलीपराव चव्हाण, श्री.उमेशराव परिचारक, श्री.ज्ञानदेव ढोबळे, श्री.तानाजी वाघमोडे, श्री.बाळासाहेब यलमर, श्री.भगवान चौगुले, श्री.लक्ष्मण धनवडे श्री.भास्कर कसगावडे, श्री.भैरू वाघमारे, श्री.गंगाराम विभुते, श्री.सुदाम मोरे, श्री.विजय जाधव, श्री.हनुमंत कदम, श्री.किसन सरवदे, श्री.सिताराम शिंदे, श्री.दिलीप गुरव, श्री.सिताराम शिंदे, श्री.शामराव साळुंखे, श्री.राणू पाटील, श्री.दाजी भुसनार आदी व कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.