पत्रकार सुरक्षा समितीचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पत्रकार सुरक्षा समितीचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन

सोलापूर // प्रतिनिधी 

उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथील पत्रकार संतोष धोत्रे यांना बातमी साठी फोटो काढल्याने कळमण गावात चार ते पाच इसमानी 19 जून रोजी लाथाबुक्क्याने मारहाण करून जखमी करून पत्रकार संतोष धोत्रे व त्यांच्या आईवर गुन्हे दाखल केले होते या घटनेचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने निषेध व्यक्त करून
पत्रकार संतोष धोत्रे यांना मारहाण करणाऱ्या इसमावर कारवाई करावी व खोटा गुन्हा पाठीमागे घेण्याबाबत पत्रकार सुरक्षा समिती ने अप्पर पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते
हल्ली पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणे व मारहाण करणे चे प्रमाण वाढले असून बातमी लावण्यावरून जर मारहाण व खोटे गुन्हे दाखल होत असतील तर पत्रकारिता करायची कशी? असा प्रश्न प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी उपस्थित करून या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी अप्पर पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन लावून धरली होती
पत्रकार सुरक्षा समितीच्या निवेदन ची अप्पर पोलीस अधीक्षक यांनी गंभीर दखल घेतली असून पत्रकार संतोष धोत्रे मारहाण व खोटे गुन्हे दाखल बाबत तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य उपाध्यक्ष मल्लिनाथ जळकोटे जिल्हा कार्याध्यक्ष शब्बीर मणियार मोहोळ तालुका अध्यक्ष अमर पवार सचिव ज्ञानेश्वर गवळी सोलापूर शहर अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार प्रसिद्धी प्रमुख भास्कर बोधूल नारायण म्हंता नागेश बंडी ऋषिकेश ढेरे श्रीनिवास वंगा अक्षय बबलाद नयन यादवाड इस्माईल शेख नंदू कांबळे दत्तात्रय पवार विष्णू पवार, गजानन शिंदे वामन निंबाळकर, नागनाथ गणपा, लक्ष्मण गणपा, अशोक माचन, हरी भिसे, इम्तियाज अक्कलकोटकर श्रीनिवास बुरा, अरुण सिडगीद्दी प्रसाद ठक्का उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here