आजच्या मॉडर्न डिजिटल युगात तरुणांना मोबाईलचे वेड नव्हे तर व्यसन जडले आहे.प्रत्येक मुलं-मुली हे मोबाईलच्या आहारी गेले असून मोबाईलच्या व्यसनापाई घरचे कामधंदेच नव्हे तर कुटुंबातील सदस्यांना सुद्धा आजचे तरुण विसरत चालले आहे.
सध्या तर मोबाईलवर ऑनलाइन रमी गेम्स खेळणे ही अनेक तरुणांची सवय झाली आहे.पण सद्यस्थितीत मात्र ही सवय व्यसनात परावर्तित होत असून श्रम करून घाम न गाळता पैसे कमावण्याची संधी असल्यामुळे सर्वत्र ऑनलाइन जुगार खेळला जात आहे.