पाऊस आला की पाणी येतं..एवढच माहीत होतं आम्हाला!पण उन्हाळ्यात सुद्धा माण नदीला पाणी आणलं आमदार शहाजीबापू पाटील यांनी:दादासाहेब लवटे
याआधी.. आम्ही पावसाळा आला कि,खूश व्हायचो.
यंदा भरपूर पाऊस पडावा व आमच्या माण नदीला पूर यावा असं वाटायचं. कारण – भरपूर पाऊस पडला तरच जास्त दिवस पाणी नदीत राहील आणि जास्त दिवस आम्हाला शेतीसाठी पाणी मिळेल.
आम्ही भोळे-भाबडे शेतकरी..अडाणी म्हंटले तरी चालेल.
दरवर्षी पावसाळ्यात आमचं एकच ध्यान असायचं कि,नदीला पूर येतो कि नाही.
आमच्या अपेक्षा सहसा जास्त प्रमाणात कधी पूर्ण झाल्याच नाहीत कारण माण नदीला सहसा पूर येतच नाही.
त्यामुळे पावसाळ्यात येईल तेवढंच पावसाचं पाणी आम्हाला पण त्याने आमच्या शेतीची भूक कधी भागलीच नाही.
ज्यावेळी २०१९ ला शहाजीबापू पाटील सांगोला विधानसभा मतदारसंघात निवडुण आले आणि त्यांनी टेंभूचं पाणी माण नदीला वारंवार सोडायला लावलं तेव्हा आम्हाला शेतकऱ्यांना माहित झाले की,भर उन्हाळ्यात सुद्धा नदीला पाणी येवू शकतय आणि आणता येतय.
याआधी…असला चमत्कार आम्हाला कधी दिसलाच नव्हता.
पुढे अजून एक आनंदाची बातमी आमच्या कानावर पडली ती म्हणजे – आमदार शहाजीबापू पाटील यांनी माण नदीला कॅनल चा दर्जा मिळवून दिला आहे.
त्यामुळे आता वर्षातून किमान 3 वेळा माण नदीला पाणी सोडले जाणार.
ज्या गोष्टी आमदार झाल्यानंतर शहाजीबापू पाटील साहेब यांनी करुन दाखवल्या त्या आजपर्यंत देशमुखांनी का केल्या नाहीत हा प्रश्न आमच्या मनात वारंवार येतो.
पाठीमागच्या पावणेपाच वर्षात कधीही आम्हाला चुकीची वागणूक मिळाली नाही.प्रत्येक पाळी आमदार शहाजीबापू पाटील साहेब यांच्या मुळे वेळेवर मिळाली.त्यामुळे आमची शेती समृद्ध झाली.
कधी कधी मनात येतं कि..2019 च्या आधीच शहाजीबापूच आमदार झाले असते तर आजपर्यंत कितीतरी उत्पन्न मिळाले असते.
पण.. तेंव्हा आम्ही अडाणीच ठरलो आमदार निवडण्यात.
आता मात्र… पून्हा एकदा आमदार म्हणून आमची पसंती पाणीदार आमदार आदरणीय शहाजीबापू पाटील साहेब यांनाच..कारण आमचा विश्वास पटलाय कि – आ.शहाजीबापू पाटील यांना दिलेलं मत वाया जावूच शकत नाही.