विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध….
(लवकरच 21 संचालकांसाठी आम्ही औपचारिक घोषणा करणार:- रणजीतभैय्या शिंदे)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक 2026/2031 बिनविरोध पार पडली असून एकूण 21 संचालकांच्या जागेसाठी 23 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यातील दोन अर्ज पूरक म्हणून भरले आहेत ,त्यामुळे इतर सर्व 21 संचालकांची बिनविरोध निवड झालेली असून त्यांची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.
वृत्तांत असा की माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बबनराव शिंदे यांचे कुशल नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली मागील 25 वर्षातील संचालक मंडळाची ही पाचवी पंचवार्षिक निवडणूक असून मागील चार पंचवार्षिक निवडणुकाप्रमाणे ही निवडणूक देखील बिनविरोध झालेली आहे. जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह बबनराव शिंदे यांच्या कुशल नेतृत्व आणि अधिपत्याखाली ही निवडणूक पार पडली असून यामध्ये जुन्या व नव्या संचालकांचा समावेश करण्यात आलेला दिसून येत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुर्डूवाडी उपजिल्हाधिकारी जयश्री आव्हाड यांनी काम पाहिले ,
संचालकांची नावे याप्रमाणे…
1) बबनराव विठ्ठलराव शिंदे, निमगाव टे.
2) पोपट दिगंबर गायकवाड, रिधोरे
3) पोपट बलभीम चव्हाण ,घोटी
4) अमोल सौदागर चव्हाण, उंदरगाव
5) विक्रमसिंह बबनराव शिंदे, निमगाव टे.
6) पंडितराव वसंतराव पाटील ,खैराव
7) विलास महादेव कौलगे ,अंजनगाव (उमाटे)
8 ) नीलकंठ भगवान पाटील ,मानेगाव
9 )अशोक विश्वनाथ मिस्कीन ,चव्हाणवाडी टे. 10) कैलास कमलाकर तोडकरी, मोडनिंब
11) सचिन कल्याणराव देशमुख, आलेगाव
12) रमेश व्यंकटराव येवले- पाटील, टेंभुर्णी
13) राजेश विश्वंभर खोत, वेताळवाडी
14 )संजय सुधाकर लोकरे , लवूळ
15 )श्रीकांत दिलीप पाटील, बावी
16) रणजीतसिंह बबनराव शिंदे, निमगाव टे. (सहकारी संस्था )
17) लाला मारुती मोरे (एससी /एसटी)
18) राजाराम निवृत्ती थोरात, टेंभुर्णी( एनटी) 19 )राजाराम मनोहर नाळे, वेणेगाव (ओबीसी) 20) सुशीला सुरेश चौगुले, अंजनगाव (खे.) (महिला)
21 )निलावती पांडुरंग घाडगे, टाकळी टे.( महिला)
22) जितेंद्र रामहरी गायकवाड, गार अकोले (ओपन)
23 )सिंधुताई सुभाष नागटिळक कुंभेज (महिला)
या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 26 होती, अर्जाची छाननी 19 फेब्रुवारी रोजी होणार असून 20 फेब्रुवारी अर्ज माघारी घेणे आहेत व त्याच दिवशी सर्व पात्र उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध होणार आहे.
या निवडणुकीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह बबनराव शिंदे म्हणाले की संचालक मंडळामध्ये जुन्या व नव्यांचा समावेश करून समन्वय साधला आहे, यापूर्वीच्या सर्व संचालकांनी आजपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आम्ही व्यक्तिशः ऋणी आहोत व आभार व्यक्त करतो. नवीन संचालकांचे पुढील कार्यकालासाठी चांगले सहकार्य मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आणि विश्वास आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कुर्डूवाडी च्या उपजिल्हाधिकारी जयश्री आव्हाड यांनी निवडणुकीमध्ये सर्वांनी योग्य प्रकारे दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांना धन्यवाद व्यक्त केले .
