विठ्ठल सहकारी साखर कारखाना बाकीच्या कारखान्यापेक्षा २ रूपये जादादरदेणार:-अभिजीताआबापाटील
(तुमच्यापेक्षा आम्ही दोन रुपये जास्त देण्याला तयार आहोत तुम्ही तयार आहात का:-अभिजित आबा पाटील)
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची ४९वी वार्षिक सर्वसाधारण सभा हजारो सभासद शेतकऱ्यांच्या उपस्थित खेळीमेळीत पार पडली.
शेतकरी सभासद बांधव मोठ्या कष्टानं ऊसाचं उत्पादन घेतात, त्यांच्या कष्टाला व मेहनतीला योग्य मोबदला मिळावा अशी माझी कायम भूमिका असेल. इतर कारखानदारांनी दिलेल्या दरापेक्षा २ रुपये जास्त शेतकरी बांधवांना भाव देणार असल्याचे जाहीर केले..
तसेच यंदाच्या वर्षी ३५०० हजार रुपये उसाला दर देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. कामगारांचे प्रश्न मार्गी लावत कामगारांना पगार वाढ करण्यात आली असल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारखान्यांची क्षमता अजून वाढवली असल्याने सभासद शेतकरी बांधवांनी कारखान्याला अधिकाधिक ऊस देण्यासाठी तयार राहावं, असे आवाहन शेतकरी बांधवांना केल.
आयत्यावेळेस सभेत आलेल्या प्रश्नांवर, शेतकरी आणि कामगार बांधवांच्या इतर महत्त्वाच्या प्रश्नांवरही सकारात्मक चर्चा झाली. यावेळी आजी, माजी संचालकासह, जेष्ठ सभासद, तोडणी ठेकेदार, कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.