विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा पहिला हप्ता २८००,जमा २६ ते ३० नोव्हेंबर दरम्यानचे बील बँकेत वर्ग
(१० दिवसाला पेमेंट देणारा राज्यातील एकमेव कारखाना. मा.आ.बबनराव शिंदे)
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब कारखान्याचा सन 2024-25 चा गाळप हंगाम सुरू झालेला असून या हंगामात गाळपास येणा-या ऊसासाठी पहीला ॲडव्हान्स हप्ता प्रति टन 2800 रूपये प्रमाणे सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांना देण्यात येणार असून 26 ते 30 नोव्हेंबर चे बील ऊस पुरवठादार शेतक-यांचे बँक खात्यात जमा करणेत आले असल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन मा.आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना मा.आ.बबनराव शिंदे म्हणाले, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब या कारखान्याचा सन 2023-25 चा गाळप हंगाम जोमाने सुरू झालेला असून या हंगामात आजअखेर युनिट नं.1 पिंपळनेर येथे आजअखेर 2 लाख 96 हजार 862 मे.टन व युनिट नं.2 करकंब येथे 1 लाख 06 हजार 981 मे.टन ऊसाचे गाळप झालेले आहे. या हंगामासाठी बँकांकडून साखर मालतारण कर्ज खात्यावर मिळणारी उपलब्धता विचारात घेवून या हंगामात गाळपास येणा-या ऊसास पहिला ॲडव्हान्स हप्ता प्रति टन 2800 रूपये प्रमाणे सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांना देण्यात येणार आहे. या हंगामात दोन्ही युनिटकडे 26 ते 30 नोव्हेंबर दरम्यान गाळपास आलेल्या ऊसास प्रतिटन रू.2800/-प्रमाणे पहिला हप्ता ऊस बील ऊस पुरवठादार शेतक-यांचे बँक खात्यात जमा करणेत आलेले आहे. या ऊस बिलापोटी 28 कोटी 37 लाख रूपये बँकेत जमा करणेत आलेले आहेत.
मागील ऊस गाळप हंगाम 2021-22 पासून हंगामात गाळप झालेल्या ऊसास शेतक-यांना 10 दिवसाला ऊस बिल पेमेंट देणेत येत आहे. या हंगामात देखील 10 दिवसाला ऊस बिलाचे पेमेंट देणेत येणार असून 10 दिवसाला पेमेंट देणारा विठ्ठलराव शिंदे राज्यातील एकमेव कारखाना आहे. विठ्ठलराव शिंदे कारखान्याने यापूर्वी प्रत्येक हंगामामध्ये वेळेत ऊस बिले शेतक-यांना व तोडणी वाहतूक बिले वाहन मालकांना दिली असल्याने शेतक-यांचा या कारखान्यावर प्रचंड विश्वास असल्याने अनेक शेतकरी आपला ऊस विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडे देण्यास पसंती देत आहेत. आजपर्यंत सर्व सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांनी सातत्याने कारखान्यास ऊस पुरवठा करून विश्वास दाखविला आहे त्याचप्रमाणे सन 2024-25 गळीत हंगामामध्येही ऊस पुरवठादारांनी त्यांचा सर्व ऊस विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे पिंपळनेर व करंकब युनिटला ऊस पुरवठा करून गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन संस्थापक चेअरमन मा.आ.शिंदे यांनी केले.