
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणे गरजेचे:- प्रा. विक्रम लोंढे
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
*प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी कोणते ना कोणते कौशल्य असते ते कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन न्यू सातारा डिप्लोमाचे प्राचार्य विक्रम लोंढे सर यांनी केले आहे. न्यू सातारा डिप्लोमा कॉलेजमध्ये गणेश चतुर्थी निमित्त श्री च्या प्रतिस्थापने बरोबरच विद्यार्थ्यांचा आनंद अधिकाधिक द्विगुणित व्हावा या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्या स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.*
*पुढे बोलताना लोंढे सर म्हणाले विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेले गुण प्रदर्शित करावेत.या स्पर्धांमध्ये प्रामुख्याने रांगोळी स्पर्धा, गणपती मूर्ती बनवणे स्पर्धा, पीपीटी प्रेझेंटेशन, लेझीम स्पर्धा या स्पर्धांचा समावेश होता. रांगोळी स्पर्धेमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या द्वितीय वर्षातील अमृता विठ्ठल कारंडे हिने प्रथम क्रमांक तर कॉम्प्युटर विभागाच्या तृतीय वर्षातील सारिका भगवान भुई व प्रणवी विठ्ठल भोसले यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. गणपती मूर्ती बनविणे या स्पर्धेमध्ये प्रथम वर्षामधील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या धनश्री अरुण बनसोडे हिने प्रथम क्रमांक तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या द्वितीय वर्षातील कोमल प्रशांत लवटे हिने द्वितीय क्रमांक मिळवला. पीपीटी प्रेझेंटेशन या स्पर्धेमध्ये कॉम्प्युटर विभागाच्या द्वितीय वर्षातील पिंकी खेताराम घांची व हर्षदा अण्णा रवळू यांनी प्रथम क्रमांक तर कॉम्प्युटर विभागाच्या द्वितीय वर्षातील वैष्णवी अजिनाथ भाकरे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागाच्या तृतीय वर्षातील शुभम सुनील शिनगारे व दरेश मल्लिकार्जुन उणदे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. लेझीम स्पर्धेमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक तर सीव्हील विभागाच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात रोख रक्कम व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.*
*यावेळी प्राचार्य विक्रम लोंढे सर, संस्था प्रतिनिधी मा.श्री. ज्ञानेश्वर शेडगे साहेब, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड सर ,रजिस्ट्रार श्री.संतोष कवठेकर सर ,सर्व विभाग प्रमुख, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .या स्पर्धा पार पाडण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सचिन पुरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्तिका नागणे मॅडम, सपना धोडमिसे मॅडम ,रोहिणी पाटील मॅडम, पूजा सरवदे मॅडम, विक्रम माळी सर, गणेश चौगुले सर, इंद्रजीत जाधव सर यांनी अथक परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विक्रम माळी सर यांनी केले तर आभार सुरज जैयस्वाल सर यांनी मानले.*
