मोदी आवास योजने अंतर्गत घरकुल लाभार्थी अनुदानासाठी पालकमंत्री मा.ना.श्री.चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे केलेल्या पाठपुरठ्याला यश: मा.आ.प्रशांत परिचारक
प्रत्येक कुटुंबाला घर असावे या हेतूने केंद्र शासनाने मोदी आवास योजने अंतर्गत 2023-2024 वर्षात घरकुल मंजूर केले. मात्र बहुतांश घरकुल धारकांना पहिला, दुसरा, तिसरा व अंतिम चौथा अनुदानित हप्ता न मिळाल्याने अनेकांचे घरकुलांचे कामे रखडलेले आहेत.
पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील घरकुल धारक पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता व चौथा अंतिम हप्ता याप्रमाणे अनेक घरकुल लाभार्थी हप्त्यांपासून वंचीत राहिलेले होते. तसेच वारंवार हेलपाटे मारून देखील हप्ते मिळत नसल्याने पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील घरकुल धारकांनी मोदी आवास योजने अंतर्गत हप्ता मिळवून द्यावा अशी मागणी केली.
त्याअनुषंगाने मार्च 2024 पासून घरकुल लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नाही त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे पाठपुरवठा केला त्यास मंत्री महोदय यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरात लवकर घरकुल लाभार्थी यांच्या खात्यात अनुदान जमा होणार असल्याची माहिती मा.आ.प्रशांत परिचारक यांनी दिली.
पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील घरकुल धारकांनी मोदी आवास या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज केलेले असून त्यातील अनेक लाभार्थी कुटुंबांना मंजूरी मिळालेली आहे.
तीन महिन्यात घरकुल बांधण्याचे उदिष्ठ होते परंतु सात ते आठ महिन्याचा कालावधी लोटूनही घरकुलांचे थकीत असलेल्या हप्त्यांमुळे कामे रखटलेली आहेत तर, बहुतांश नागरिकांना राहण्याची सोय नसल्याने इतरांच्या घरी भाड्याने राहावे लागत आहे. अनुदानाला लागत असलेला विलंब ऐन पावसाळ्यात राहण्याची सोय नाही.
पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील घरकुल धारकांना मोदी आवास योजनेअंतर्गत अनुदान मिळावे यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरात लवकर घरकुल लाभार्थी यांच्या खात्यात अनुदान जमा होणार असल्याची माहिती मा.आ.प्रशांत परिचारक यांनी दिली व पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.