
पंतप्रधान आवास योजना अंतर्गत महाराष्ट्रातील वीस लाख बेघरांना घराच्या मंजुरीचे पत्र!
टाकळी सिकंदर येथे 199 घरकुल धारकांना मंजूर पत्राचे वाटप:सुनीलदादा चव्हाण
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या पंतप्रधान आवास योजना अंतर्गत महाराष्ट्रातील वीस लाख बेघरांना घराच्या मंजुरीचे पत्राचे वाटपाचा कार्यक्रम काल पुणे येथे भारताचे गृहमंत्री अमितजी शहा तसेच लाडके मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडवणीस उपमुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे व माननीय अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत पार पडला या मंजूर घरकुल पत्र वाटपाचा कार्यक्रम स्थानिक पातळीवर मोहोळ तालुक्यातील मौजे टाकळी सिकंदर येथे भाजपाचे मोहोळ तालुका अध्यक्ष सुनीलदादा चव्हाण यांच्या हस्ते 199 घरकुल धारकांना मंजूर पत्र देण्यात आले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या पंतप्रधान आवास योजना अंतर्गत महाराष्ट्रातील लाखो बेघरांना आपल्या हक्काचे घर मिळाले आहे त्या टाकळी सिकंदर येथील तब्बल 199 पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी ठरले आहेत या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घराच्या मंजुरीचे पत्राचे वाटप करण्यात आले असल्याची माहीती मोहोळ तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी दिली.
यावेळी मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुनील दादा चव्हाण, सरपंच नानासाहेब सोनटक्के, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते शिवाजीराव चव्हाण, लोकनेतेचे संचालक अशोकराव चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे नेते भीमराव वसेकर, उपसरपंच शिराज तांबोळी, ग्रामसेवक सौ प्रतिभा भानवसे तसेच पंतप्रधान आवास योजनेतील सर्व लाभार्थी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.