उजनी धरण साखळीतील पहिले धरण 100 % भरले!
भीमा खोऱ्यात पावसाची जोरदा हजेरी
उजनी धरण साखळीतील १९ धरणापैकी एक असलेले पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पश्चिम भागात असलेले कळमोडी धरण शनिवारी मध्यरात्री १०० टक्के भरले आहे.यातून ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
धरण साखळीतील धरणाचा पाणीसाठ्यात वाढ होत आहे तसेच उजनीत रविवारी दौंड मधून येणा-या विसर्गात वाढ होऊन ८५१६ क्युसेकचा विसर्ग सुरु असल्याने उजनीचा पाणी साठा ५१.३६ टीएमसी तर वजा २२.९६ टक्के झाला आहे.
भीमा खोऱ्यात पावसाची सुरू असलेली संततधार यामुळे उजनीच्या वरील धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.ही बाब सोलापूर जिल्हा वाशीयांसाठी दिलासादायक आहे. मागील आठवड्यात उसंत दिलेल्या पावसाने हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत मागील दोन दिवसांपासून भीमा खोरे, भीमाशंकर,पुणे जिल्ह्यातील पश्चिम भाग व खेड परीसरासह सर्वत्र हजेरी लावली.
उजनी धरण साखळीत असलेल्या कळमोडी धरण १०० टक्के भरले. तर, वडीवळे-७९.४७, खडकवासला ७२.१७, वरसगाव ४०.२७, पानशेत ५४.०७, चिल्हेवाडी ४६.५०, पवना ४१.८४, आंद्रा ३८.९६, कासारसाई ४९.१३, मुळशी ३९.६०, टेमघर ३५.३१, वरसगाव ४०.२७, पानशेत ५४.०७ टक्के या धरणांचा पाणी साठ्यात वाढ होऊन बऱ्यापैकी वधारला आहे.
उजनी पाणीपातळी
एकूण पाणीसाठा ५१.३६ टिएमसी
उपयुक्त पाणीसाठा टिएमसी वजा १२.३०/
एकूण पाणी पातळी वजा २२.९६
टक्के
दौडमधून येणारा विसर्ग – ८५१६
भीमा व नीरा खोऱ्यातील धरणांची टक्केवारी पुढीलप्रमाणे
माणिकडोह ११.७७,येडगाव-३२.४७,
वडज – ३१-७७, डींभे – २५.७९ डींभे,
घोड – ०८.६५विसापुर – २१.३२
चिल्हेवाडी – ४६.५० कळमोडी -१००,
चासकमान-२०.१२,भामाआसाखेड-२९.५४, वडीवळे-७९.४७, आंद्रा-३८.९६,
पवना+४१.८४,कासारसाई-४९.१३ ,
मुळशी-३९.६०, टेमघर -३५.३१,
वरसगाव ४०.२७, पानशेत-५४.०७,
खडकवासला ७२.१७, गुंजवणी ५४.२४,
निरा देवघर- ४५.०७भाटघर ४५.७८,
वीर ४९.३१, नाझरे ००.०० ,
उजनी वजा २२.९५.