जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भगीरथ दादा भालके यांची पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघात मोर्चेबांधणी
नानांच्या जनसेवेचा रथ, चालवेल आपला भगीरथ हे स्लोगन ठरत आहे पंढरपूर मंगळवेढ्यात फेमस!
या जनआशीर्वाद यात्रेमुळे स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या आठवणींना मिळणार पुन्हा एकदा नवा उजाळा!
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार भगीरथ दादा भारत भालके यांनीही आता जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील जनतेशी व मतदारांची संवाद साधण्याचे जाहीर केले असुन दिनांक १४सप्टेंबर पासून सुरू होणारी ही जन आशीर्वाद यात्रा 29 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू राहणार असून, या माध्यमातून ते मंगळवेढा तालुक्यापासून सुरुवात करणार असून त्याचा शेवट पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे संपणार आहे. 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार भगीरथ दादा भारत नाना भालके हे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. त्यांनीही आता पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या रणांगणामध्ये उडी मारली आहे आता या मतदारसंघांमध्ये जवळजवळ चार ते पाच संभाव्य उमेदवार असून मागील निवडणुकीमध्ये निसटता पराभव स्वीकारावा लागणाऱ्या भगीरथ दादा भारत नाना भालके यांना आता पुढील अनेक उमेदवारांना सामोरे जावे लागणार आहे यामध्ये जरी महाविकास आघाडी पक्षाकडून कोणालाही उमेदवारी जाहीर झाली नसली तरीही भगीरथ दादा भालके यांनी तयारी सुरू केल्यामुळे तेही या आगामी विधानसभा निवडणुकीत निश्चित उतरणार असल्याचे दिसत आहे..