*सत्ताधाऱ्यांनी संविधानांची पूर्णपणे पायमल्ली केली आहे:- भगिरथ भालके*
*माजी आई निवडुण आल्यानंतर तेच नगरपालिकेत जाणार आहे.मी नाही:- सिध्देश्वर आवताडे*
*भगीरथ दादा भालके यांचा सुद्धा सत्ताधारी आमदारांचा विरोधकांवर जोरदार प्रहार*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
मंगळवेढा शहरात पुन्हा एकदा नव्याने सुरू झालेल्या निवडणुकीमध्ये काल तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा संकल्प जोगेश्वरी मंगल कार्यालयात मेळावा संपन्न झाला. यावेळी सत्ताधारी विकास आघाडीच्या विरोधात सर्वच नेते मंडळींनी एकच मोठी आग पाखड केली… यावेळी माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे सर यांनी सत्ताधारी सर्व विरोधकांचा चांगलाच खरपूस समाचार यावेळी घेतला.. सर्व जण आता एकत्र आले असून मागच्या वर्षीच विधानसभा निवडणुकीला काय परिस्थिती होती आणि आत्ता काय परिस्थिती आहे नगरपरिषद निवडणूक आहे का दुसरे काय हे समजत नसून राजकारणाचा यांनी बाजार मांडला असल्याचा गंभीर आरोप यावेळी ढोबळे सरांनी केला..
भगीरथ भालके यांनी तर पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान दादा आवताडे, इतर सर्व सदस्यांवर आपल्या भाषणातून जोरदार टीका केली… संविधानाची पायमल्ली सत्ताधारी लोक करत असून त्यांनी *”हम करे सो कायदा”* या म्हणीप्रमाणे सगळ्यांना वागणूक देण्यास सुरुवात केली आहे.. पंढरपूरला पण असाच प्रकार झाला असून सर्व यंत्रणा ही. दबावाखाली काम करत असून माझ्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्या साठी यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणला आहे.. यावेळी सिद्धेश्वर दादा अवताडे यांनीही सर्वांनाच धारेवर धरले असून नगरपरिषद यांची काय खाजगी प्रॉपर्टी आहे का असाच प्रतिप्रश्न त्यांनी विचारला…मी स्वतः पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर लिहून देतो की; नगराध्यक्ष झाल्यानंतर माझ्या आईच येथील सर्व कारभार करणार असुन, विरोधकांना माझे ओपन चॅलेंज आहे की, ते पण असे काही जाहीर करतात का.. कुठल्याही वावड्या आणि अफवा कुठल्या जात असून तशा कुठल्याही अफवांना आमचा येथील सुज्ञ मतदार बळी पडणार नसल्याचीही यावेळी पत्रकारांशी बोलताना सिद्धेश्वर आवताडे यांनी सांगितले……
यावेळी या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात मंगळवेढा शहरातील जनसमुदाय उपस्थित होता..

