
मोजै इंचगाव येथे अज्ञात दरोडेखोरांकडून धाडसी दरोडा!
बंडू सोपान डोके यांच्याकडून कामती पोलीस स्टेशन येथे अज्ञात दरोडेखोराविरुद्ध गुन्हा दाखल!
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील इंचगाव येथे, दरोडेखोराकडून दरोडा टाकण्यात आला असून, यामध्ये फिर्यादी बंडू सोपान डोके यांच्या राहत्या घरी पहाटे पाच ते साडेपाचच्या दरम्यान हा भीषण असा दरोडा पडला असून यामध्ये रात्रीची वेळ साधून या दरोडेखोरांकडून लुटमार करण्यात आली आहे. मंगळवेढा ते सोलापूर महामार्गालगत इंचगाव येथे हा दरोडा टाकण्यात आल्यामुळे तेथील वाड्या वस्तीवरील नागरिक भयभीत झालेले आहेत. महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे व फुटेज तपासले असता दोन अज्ञात नागरिक हे मोटरसायकलवर दिसून येत आहेत.यामध्ये फिर्यादी बंडू सोपान डोके यांच्याकडून कामती पोलीस स्टेशन येथे या या अज्ञात दरोडेखोरांच्या विरोधात FRI दाखल करण्यात आले असून, या FIR मध्ये जवळजवळ २ ते २.५ लाख, किमतीचे सोन्याचे दागिने व मोबाईल फोन लंपास करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. याबाबत कामती पोलीस स्टेशनचे पोलिस अंमलदार, माने साहेब पुढील तपास करत आहे.