सीमोल्लंघन करूया माढ्याच्या विकासाचा रथ पुढे नेऊया: अभिजीत पाटील
माढ्याच्या विकासासाठी येणाऱ्या काळात परिवर्तनाची नांदी : अभिजीत पाटील
माढ्याचा २५ वर्षाचा बॅकलॉक भरून काढू: अभिजीत पाटील
रावण दहन करून माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन संपन्न
आपले महापुरुष सीमोल्लंघन करून लढाईच्या मोहिमेवर जात होते. तो आदर्श घेऊन मी पुढे जात आहे. इथल्या शेवटच्या घटकाचा विचार करून माढ्याच्या २५ वर्षाचा बॅकलॉक भरून काढण्यासाठी आणि माढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी साथ मिळेल असा विश्वास व्यक्त करत चेअरमन अभिजीत पाटील यांनी माढ्याच्या विकासाचा रथ पुढे नेऊया असे आवाहन दसऱ्याच्या मुहूर्तावर रावण दहन प्रसंगी येथील जनतेला केले.
ते माढा येथे आयोजित करण्यात आलेल्या माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सव या कार्यक्रमात बोलत होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की; उद्याच्या काळात फक्त ऊस आणि पाण्यावर बोलून चालणार नाही तर इथल्या शेवटच्या घटकाचा विचार करून माढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले पाहिजे, युवक, महिलावर्ग, बेरोजगारी, सांस्कृतिक जडणघडण याचबरोबर ज्या युवकांकडे शेतजमीन नाही त्यासाठी काम केले पाहिजे. व्यावसायिक करणाऱ्यांना चालना दिली पाहिजे, माढ्याच्या २५ वर्षाचा बॅकलॉक भरून काढावा लागेल यासाठी येथील जनतेची साथ मिळेल असा विश्वास व्यक्त करत ते म्हणाले की कायम अधर्मावर, असत्यावर विजय मिळवता येतो. असत्य खूप काळ टिकत नाही. उद्याच्या काळात सत्याच्या बाजूने उभे राहण्यासाठी येथील जनता सज्ज आहे. प्रत्येक युवकाच्या सोबत हातात हात दिल्यानंतर जी तडफ जाणवते ती तडफ उद्याच्या परिवर्तनाची नांदी दिसत आहे असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी त्यांनी माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून कृषीविषयक मार्गदर्शन आणि सायंकाळी संस्कृती कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठल प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेण्यात आला असल्याचे सांगत पुढील काळात असे वेगवेगळे प्रयोग घेत नाही तोपर्यंत येथील तरुणांना ऊर्जा मिळणार नाही. उद्याच्या काळात माढेकरांना अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. यासाठी येणाऱ्या काळात परिवर्तन करावे लागेल माढ्याच्या भविष्यासाठी सीमोल्लंघन करूया माढ्याच्या विकासाचा रथ पुढे नेऊया असे आवाहन अभिजीत पाटील यांनी यावेळी केले.
यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड संघटक दिनेश जगदाळे, डॉ.हनुमंत क्षीरसागर, केवडचे मा. सरपंच पांडुरंग शिरसाट, आबासाहेब साठे, ऋषीकेश तांबिले, आटकेपार झेंडा ग्रुपचे दयानंद महाडिक, उंदरगाव मा.उपसरपंच संजय तांबिले, यशवंत भोसले सर, सागर मसूरकर, समाधान गडेकर, दत्तात्रय पाटेकर, गोटू नाईक, किरण पाटेकर, दीपक इंगळे, प्रीतम पाटेकर, सुरज बारबोले, जनहित शेतकरी संघटना बालाजी बारबोले यासह आदी मान्यवर उपस्थित होते..