
टाकळी सिकंदरच्या तेजल वसेकरची एमपीएससी मधून सहाय्यक कार्यकारी अभियंता पदावर निवड
शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील बाळासाहेब वसेकर गुरुजी व सीमा वसेकर मॅडम यांची कन्या तेजल वसेकर हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी परीक्षेत यश संपादन करून सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासनांतर्गत सहाय्यक कार्यकारी अभियंता या प्रतिष्ठित पदावर निवड मिळवली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल टाकळी सिकंदर गावात अभिनंदन व सत्कार सोहळा पार पडला. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या हस्ते तेजलचा सत्कार करण्यात आला. त्यांनी पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन तेजलचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या वेळी बोलताना मा. चरणराज चवरे म्हणाले की, “तेजल वसेकर हिने प्रचंड मेहनत, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिच्या धडपडीमुळे टाकळी सिकंदर गावाचे नाव उज्ज्वल झाले असून हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.”
सत्कार सोहळ्याला गावातील वसेकर परिवारासह मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये भाऊराव वसेकर, महेश वसेकर, ब्रम्हदेव वसेकर, प्रशांत वसेकर, संतोष चव्हाण, जमीर मुजावर, धर्मराज वसेकर, संजय वसेकर यांचा सहभाग होता. तसेच चरणराज चवरे मित्र परिवार, टाकळी सिकंदर यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
तेजलच्या या यशामुळे टाकळी सिकंदर गावाचे नाव राज्यात गौरवाने घेतले जात असून गावात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण आहे.
कोट
तेजलचे यश इतर विद्यार्थ्यांनसाठी प्रेरणादायी ठरेल
तेजल वसेकर हिने कठोर परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर एमपीएससी मधील यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे टाकळी सिकंदर गावाचे नाव उज्ज्वल झाले असून हे क्षण संपूर्ण गावासाठी अभिमानाचे आहेत.तेजलने कठोर परिश्रम जिद्द चिकाटी बाळगून हे यश संपादित केले असून तिचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल
चरणराज चवरे,शिवसेना जिल्हाप्रमुख सोलापूर
