
*टा. सिकंदर पंचायत समिती गणामध्ये युवा नेते संतोष दादा चव्हाण यांची दावेदारी फिक्स?*
*जनसामान्यातला आवाज म्हणून युवा नेते संतोष चव्हाण यांना पंचायत समिती गणामध्ये संधी देण्याची युवा वर्गामध्ये मागणी!!!*
*(सर्व प्रस्थापित नेते मंडळींना बाजूला सारत नवीन आघाडी करण्याचे संतोष दादा चव्हाण यांचे संकेत!)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
*टा. सिकंदर पंचायत समिती गणामध्ये युवा नेते संतोष दादा चव्हाण यांची दावेदारी फिक्स!*
*जनसामान्यातला आवाज म्हणून युवा नेते संतोष चव्हाण यांना पंचायत समिती गणामध्ये संधी देण्याची युवा वर्गामध्ये मागणी!*
*सर्व प्रस्थापित नेते मंडळींना बाजूला सारत नवीन आघाडी करत सेनेच्या माध्यमातून धडाडीचे काम करणारे संतोष चव्हाण उमेदवारीसाठी नक्कीच दावेदार!*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
टाकळी सिकंदर येथील नवउद्योजक व उमदे नेतृत्व म्हणून समजले जाणारे संतोष दादा चव्हाण हे आगामी येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीसाठी टाकळी सिकंदर गणातून उमेदवारीसाठी प्रयत्नशील असून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मोठे काम उभारून त्यांनी जनमानसांमध्ये एक “अढळ” स्थान प्राप्त केले आहे. आपल्या उद्योग व्यवसाय व आपल्या दुकानदारीच्या माध्यमातून त्यांनी टाकळी सिकंदर व परिसरामध्ये आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून त्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी सर्व गोरगरीब दिनदलित व कष्टकरी जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मोहोळ तालुक्याच्या राजकारणामध्ये एक आगळे वेगळे स्थान निर्माण करून संतोष दादा चव्हाण यांनी शिवसेना पक्षाच्या व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष चरण राज चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कामाचा धडाका लावला असून ते येणाऱ्या आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी टाकळी सिकंदर गणातून दावेदार ठरू शकतात.. मार्गदर्शक प्रशांत वसेकर व जिल्हाध्यक्ष चरण राज चवरे यांच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम या भागात केले आहे.. दिनांक मा.संतोष दादा चव्हाण यांनी अनेक समाज उपयोगी कामे शिवसेना पक्षाच्या व जिल्हाध्यक्ष चरणराज चवरे यांच्या माध्यमातून केली असून ते टाकळी सिकंदर पंचायत समिती गणासाठी दावेदार ठरू शकतात.. यावेळी आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी मी टाकळी सिकंदर पंचायत समिती गणासाठी पूर्ण तयारी करत असून टाकळी सिकंदर व परिसराचा विकास पंचायत समितीच्या माध्यमातून करण्यात आली मी संपूर्णपणे आग्रही आहे.. असे सांगितले…
यावेळी सरपंच नाना सोनटक्के प्रशांत वसेकर,भाऊराव वसेकर संतोष बचुटे, जमिर मुजावर, ब्रम्हदेव वसेकर, दिनेश चव्हाण,मुन्ना, भुसे हणमंत पाटील,राहुल चव्हाण, धर्मराज वसेकर राज वसेकर, दादा कांबळे, या सर्व कार्यकर्त्यांचा युवा नेते संतोष दादा चव्हाण यांना जाहीर पाठिंबा असून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्वजण मिळून एकत्र येत नक्कीच पेनुर जिल्हा परिषद व टाकळी सिकंदर पंचायत समिती गणामध्ये परिवर्तन घडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत!!!
