सुशील भैया क्षीरसागर यांचा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकर नाना वाघमारे यांनी केला सन्मान!
(मतमोजणीच्या आदल्या दिवशीच वाढदिवस साजरा झाल्यामुळे संपूर्ण मोहोळ तालुक्यातील भाजपमध्ये उत्साह)
(शंकर नाना वाघमारे यांनी सुशील भैया क्षीरसागर यांना दिल्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
मोहोळ तालुक्यातील भाजपाचे नेते सुशील भैया क्षीरसागर यांचा वाढदिवस अत्यंत उत्साही वातावरणामध्ये साजरा करण्यात आला याच वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष शंकर नाना वाघमारे यांनी सुशील भैया क्षीरसागर यांचा त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये जाऊन सन्मान केला.. वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दिल्याच पण आगामी सर्व राजकीय वाटचालीसाठी सुद्धा त्यांनी सुशील भैया क्षीरसागर यांना शुभेच्छा दिल्या!
हा वाढदिवस नेमका उद्या पार पडणाऱ्या नगर परिषदेच्या निकाला पूर्वी एक दिवस अगोदर आल्यामुळे या वाढदिवसाला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे. सुशील भैया यांचे कार्य हे जनमानसामध्ये सर्वात मोठे कार्य असून आत्ताच दिनांक २ डिसेंबर रोजी झालेल्या मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या सौभाग्यवती शितल सुशील क्षीरसागर या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार होत्या.. उद्या नक्कीच भाजपाचे सर्व उमेदवार व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ शितलताई शिरसागर या मोठ्या मताधिक्याने विजयी होतील व मोहोळ शहराला एक विकासात्मक दृष्टिकोन असणारा नेत्या मिळतील असाही ठाम विश्वास यावेळी माजी जिल्हाध्यक्ष शंकर नाना वाघमारे यांनी व्यक्त केला..
यावेळी त्यांच्यासोबत सोलापूर जिल्हा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री शंकरराव वाघमारे, मोहोळ तालुका भाजपचे माजी तालुका अध्यक्ष तथा सौंदणे चे माजी उपसरपंच संतोष नामदे, सौंदणे चे ग्रामपंचायत सदस्य रमेश भानवसे, जि. प. शाळा सौंदणे चे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम भानवसे, युवा मोर्चा चे सागर दादा लेंगरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते
