
श्री शनेश्वर महाराज सामाजिक प्रबोधन पायी दिंडी सोहळ्याचे पोथरे येथून प्रस्थान!
(प्रा. रामदास झोळ सर व सौ मायाताई झोळ यांच्या शुभहस्ते आरती संपन्न)
पंढरपूर येथे आषाढी वारी सुरू असून 6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक भक्त पंढरी नगरीत येत आहेत. तसेच सर्व श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी सुध्दा मोठ्या भक्ती भावाने पंढरपूरकडे मार्गक्रमण करीत आहेत.
श्री शनेश्वर महाराज सामाजिक प्रबोधन पायी दिंडी सोहळा पोथरे ता.करमाळा या पायी दिंडीचे आज पोथरे येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यावेळी श्री शनेश्वर महाराज सामाजिक प्रबोधन पायी दिंडीचे आरती दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर व सौ.मायाताई झोळ मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी पायी दिंडी सोहळ्यासह श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या असंख्य वारकऱ्यांना प्रा.रामदास झोळ सर यांनी आषाढी वारी सुखाची,आनंदाची व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या.