
सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही:- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार*
*(कुठल्या नियम व अटी न लावता झालेल्या सर्व नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करा उपमुख्यमंत्री अजित दादांनी अधिकाऱ्यांना सोनावले खडे बोल)*
*(जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांच्या सावली या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची सदिच्छा भेट)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
गेल्या जवळजवळ आठ दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवला असताना सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, करमाळा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व सोलापूर व पंढरपूर भागात ढगफुटी पाऊस झाल्यामुळे या पावसामुळे अनेक गोरगरीब व कष्टकरी शेतकऱ्यांचे पशुधन व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.. माढा माढा तालुक्यातील उंदरगाव वाकाव खैराव कव्हे,लव्हे, राहुल नगर, याचबरोबर मोहोळ तालुक्यातील लांबोटी व परिसरातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी व सिना नदीला आलेल्या महापुरामुळे खूप भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे..
याच अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी काल दिनांक २३ सप्टेंबर रोजी झालेल्या भागासाठी जवळजवळ 2215 कोटी रुपयांची पॅकेज जाहीर केले आहे.. त्याचबरोबर लगेचच ताबडतोब त्यांनी आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्याच्या दौरा केला याबरोबरच राज्याची उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनीही माढा करमाळा व मोहोळ तालुक्यातील अनेक गावांना व तेथील पूर परिस्थिती असलेल्या भागांना स्वतः भेट दिली.
यावेळी त्यांनी कुठल्याही नियम व अटी न लावता सर्व नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करण्यात यावेत तसेच कुठल्याही शेतकऱ्यांना व नागरिकांना त्रास देऊ नका ते आपलेच आहेत.असेही सर्व अधिकार्यांना सांगितले. सोलापूर जिल्हा व मोहोळ तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आम्ही कधीही काही कमी पडू देणार नाही निधी बाबतीत तुम्ही कुठलीही काळजी करू नका निधी देण्यासाठी मी सक्षम आहे. फक्त सर्व शेतकऱ्यांची पुनर्वसन व्यवस्थित झाली पाहिजे असेही यावेळी पत्रकारांच्या प्रश्नोत्तराला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी उत्तर दिले..
यावेळी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजाभाऊ खरे याचबरोबर सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा व विशेषतः मोहोळ तालुक्यातील सर्व पदाधिकारी सर्व फ्रंटल सेलचे कार्यकर्ते सर्व शासकीय अधिकारी मोहोळ पोलीस स्टेशनची पूर्वेक्षक हेमंत शेंडगे, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन मुळीक यावर सर्व विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते..
