खेड भाळवणी येथे स्वाभिमानी आमदार अँडवोकेट शहाजी बापू पाटील यांच्या शुभहस्ते विविध विकास कामाचे उद्घाटन संपन्न
(सिद्धनाथ मंदिर व मारूती मंदिराला भजनीमंडळासाठी खोलीचे भूमिपूजन व विविध ठिकाणचे अँड आमदार शहाजी बापू यांनी केले उद्घाटन!)
२४५,सांगोला विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील खेड भाळवणी येथे जनतेचे आमदार अँडवोकेट शहाजी बापू पाटील यांना ज्ञानवर्धिनी वाचनालयाचे संस्थापक राजेश पवार यांनी नवीन बांधकामासाठी व अभ्यासिका वर्गासाठी निधीची मागणी केली आहे.
या मागणीची दखल घेऊन आमदार शहाजी बापू पाटील यांनी संस्थापक अध्यक्ष राजेश पवार यांना नवीन वस्तू बाबत शब्द दिला आहे निधीची उपलब्धता झाल्यानंतर लगेचच बांधकामाला सुरुवात करूया असे आश्वासन यावेळी बोलताना अँडवोकेट आमदार शहाजी बापू पाटील यांनी यावेळी दिले.
यामध्ये या खेडभाळवणी गावासाठी सिद्धनाथ मंदिरच्या सभामंडपास 10 लाख रूपये, आंबाबाई मंदीर रस्ता 10 लाख रूपये, छत्रपती शिवाजी नगर येथील रस्त्यासाठी 18 लाख रूपये तसेच दलीत वस्तीसाठी 10 लाख रूपये तसेच मारूती मंदीर येथील भजनीमंडळासाठी दोन खोल्यांच्या बांधकामासाठी 1 लाख रूपये निधी एकूण 50 ते 60 लाख निधी विकास कामे आमदार शहाजीबापु पाटील यांच्या फंडातून देण्यात आले आहे.
यावेळी खेड भाळवणीयेथील विठ्ठलची माजी संचालक बिभीषण दाजी पवार, यशवंतराव नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, पांडुरंगचे विद्यमान संचालक श्यामराव सांळुखे, ज्ञानवर्धिनी वाचनालयाचे प्रमुख आर के पवार सर, माजी उपसरपंच लक्ष्मण सांळुखे, विद्यमान उपसरपंच शहाजी पाटील, दत्ता पवार,पोपट पवार,मेजर गजानन पवार, राहूल पवार, सचिन घालमे सर, नवनाथ पवार, अनंता घालमे, मारुती भाऊ पवार, गणेश साळुंखे सर,आमदार शहाजी बापू पाटील यांचे खंदे समर्थक शरदराव पवार, पप्पु पवार,याचबरोबर खेड भाळवणीतील पवार साळुंखे, मस्के धुमाळ व घालमे परिवारातील सर्व सदस्य व खेड भाळवणी येथील सर्व आबालवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.