श्री संत दामाजी साखर कारखान्याची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या संपन्न होणार:-कार्य संचालक राम पाटील
मंगळवेढा दि।१४/०९/२०२४ ः- श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची सन
२०२३-२४ या आर्थिक वर्षाची अधिमंडळाची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा
रविवार दि।१५/०९/२०२४ रोजी दुपारी ठिक १।०० वाजता कारखाना कार्यस्थळावर
कारखान्याचे चेअरमन श्री शिवानंद पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार
असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री राम पाटील यांनी
दिली।या सभेत मागील वार्षिक सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, सन २०२३-२४
या आर्थिक वर्षाचा संस्थेच्या कामकाजाविषयी अहवाल स्विकारणे, ताळेबंद व
नफा-तोटा पत्रके स्विकारणे व त्यास मान्यता देणे, वैधानिक लेखापरिक्षक
यांचेकडून आलेला यांचा लेखा परिक्षण अहवाल वाचून नोंद घेणे, संचालक
मंडळाने सादर केलेला दोष दुरुस्ती अहवाल स्विकारणे व त्यास मान्यता देणे,
आर्थिक वर्षात अंदाजपत्रकापेक्षा कमी-जास्त झालेल्या जमाखर्चास मंजूरी
देणे, पुढील आर्थिक वर्षाकरिता संचालक मंडळाने तयार केलेल्या
अंदाजपत्रकास मान्यता देणे, पुढील वर्षाकरिता वैधानिक लेखापरिक्षक व
आवश्यकतेनुसार इतर सल्लागारांच्या नेमणूका करणे, कारखान्याची गाळप क्षमता
वाढविणे, सहविजनिर्मिती प्रकल्प तसेच आसवानी प्रकल्प (डिस्टीलरी) उभारणी
करणे, आर्थिक वर्षातील अनावश्यक भंगार माल विक्रीस मान्यता देणे व
मा।अध्यक्ष यांचे पूर्व परवानगीने सभासदांनी विचारलेले प्रश्न व
धोरणात्मक सुचनांचा विचार करणे इत्यादी विषयांवर या वार्षिक सर्वसाधारण
सभेमध्ये विचार-विनीमय होणार आहे।
तरी आपले तालुक्यातील सहकारी तत्वावर चालु असलेल्या आपल्या श्री
संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण
सभेसाठी रविवार दि।१५/०९/२०२४ रोजी दुपारी ठिक १।०० वाजता कारखाना
कार्यस्थळावर जास्तीत जास्त सभासदांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन माश्री। शिवानंद पाटील व व्हा चेअरमन श्री तानाजीभाऊ खरात यांनी केले आहे.
सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री
मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील,
भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा
दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे,
तानाजी कांबळे, सौ।निर्मला तानाजी काकडे, सौ।लता सुरेश कोळेकर,
कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी, सभासद-शेतकरी
उपस्थित होते.