संत दामाजी साखर कारखान्याचा दि।२८ ऑक्टोबर २०२५ रोजी गळीत हंगाम शुभारंभ
(मा. प्रा. शिवाजीराव काळुंगे सर व सौ.शोभाताई शिवाजीराव काळुंगे सर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ हंगामाकरिता ३३ वा गळीत हंगाम शुभारंभ मंगळवार दिनांक २८ ऑक्टोबर, २०२५ रोजी सकाळी ११।१५ वाजता कारखान्याचे माजी चेअरमन मा।प्रा।श्री।शिवाजीराव बाजीराव काळुंगे व त्यांच्या सुविद्य पत्नी धनश्री महिला सहकारी पतसंस्था मंगळवेढा या संस्थेच्या चेअरमन मा।प्रा।सौ।शोभाताई शिवाजीराव काळुंगे या उभयतांचे शुभहस्ते व कारखान्याचे माजी चेअरमन मा। अँड श्री।नंदकुमार भागवत पवार यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे। तसेच सदर प्रसंगी रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा (शेठजी), जिजामाता पतसंस्थेचे मार्गदर्शक रामकृष्ण (मामा) नागणे, कारखान्याचे माजी व्हा।चेअरमन रामचंद्र वाकडे, बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन दामोदर(बापू) देशमुख, कारखान्याचे माजी संचालक यादाप्पा माळी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। सदर दिवशी सकाळी १०।१५ वाजता कारखान्याचे संचालक मा।प्रा।श्री।रेवणसिध्द चंद्रकांत लिगाडे व त्यांच्या सुविद्य पत्नी मा।सौ।रुपाली रेवणसिध्द लिगाडे यांचे शुभहस्ते श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन केले असल्याची माहिती कारखान्याचे प्र।कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी दिली।
चालु हंगामात कार्यक्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे ऊसाची वाढ चांगली झालेली आहे। त्यामुळे या हंगामात ऊसाची कमतरता भासणार नाही। पुर्ण क्षमतेने कारखाना चालविणेसाठी आवश्यक असणारी ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा बैलगाडी २२५, डंपिंग टॅक्टर २००, टॅक्टर १९० व हार्वेस्टर मशिन ९ भरती करुन त्यांना अँडवान्स दिलेला असुन बीड, जालना, अहिल्यानगर भागातील बैलगाडी व डंपिंग टॅक्टर अशी यंत्रणा कारखाना साईटवर आलेली आहे। येणा-या हंगामाकरिता कारखाना संचालक मंडळाने ५।०० लाख मे।टन ऊस गळीताचे उद्दीष्ठ ठेवले असून सर्व सभासद बंधु, ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी वर्ग, तोडणी यंत्रणा, ठेकेदार यांच्या सहकार्याने गाळपाचे हे उदिष्ठ निश्चीतच पूर्ण करणार आहोत। तरी या कार्यक्रमासाठी सर्व सभासद-शेतकरी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री शिवानंद पाटील व व्हा।चेअरमन श्री तानाजीभाऊ खरात यांनी केले आहे।
सदर प्रसंगी कारखान्याचे व्हा।चेअरमन श्री।तानाजीभाऊ खरात, संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, तसेच कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख उपस्थित होते.

