सांगोला तालुक्यातील लोणारी समाज व सकल जैन समाज बांधवांच्यावतीने आ. शहाजीबापू पाटील यांचा सत्कार संपन्न!
सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे तालुक्यातील लोणारी समाज बांधव व सकल जैन समाज बांधवांनी आपल्या समाजाच्या विविध प्रकारच्या मागण्या मांडल्या होत्या. आमदार शहाजी बापू पाटील यांनी या मागण्यांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने या समाज बांधवांना आश्वासन देत महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागण्यांचा पाठपुरावा करून भरिव निधी प्राप्त केला. लोणारी व जैन समाजबांधवांनी आमदार शहाजीबापू पाटील यांचा संपर्क कार्यालयामध्ये उपस्थित राहून भव्य असा सन्मान करीत आभार व्यक्त केले. त्याचबरोबर आम्ही सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून साथ देऊ असा विश्वास व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आमदार शहाजीबापू पाटील यांनी लोणारी समाजाच्या समाजभवनासाठी व इतर विकासकामासाठी २कोटी रुपये निधी खेचून आणला. तसेच राज्यातील लोणारी समाजासाठी लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले. त्याबद्दल लोणारी समाज बांधवांनी आमदार शहाजीबापू पाटील यांचा भव्य असा सत्कार करीत आभार व्यक्त केले.
सांगोला शहरातील सकल जैन समाज बांधवांच्या मागण्या मान्य करीत त्यागी निवास व समाज मंदिर बांधकामासाठी 50 लाख रुपये निधी मंजूर केला. याची कृतज्ञता म्हणून जैन समाज बांधवांनी आमदार शहाजीबापू पाटील यांचा सत्कार करीत आभार व्यक्त करून भविष्यात सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले.