१.००कोटी लिटर इथेनॉलचा करणार पुरवठा!
युटोपियन शुगर्स इथेनॉल ब्लेंडिग प्रोग्रॅममध्ये सहभागी – रोहन परिचारक
कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि. कारखान्याच्या या गळीत हंगामातील प्रथम इथेनॉल टँकरचे पुजन कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. युटोपियन शुगर्सचा 2024-2025 हा अकरावा गळीत हंगाम नुकताच सुरु झाला आहे. युटोपियन शुगर्सने केंद्र शासनाच्या आवाहनास प्रतीसाद देत राष्ट्रीय स्तरावरील इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रॅममध्ये सहभाग घेतला आहे. त्यानुसार सुमारे 1.00 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल या कंपन्यानकडे करण्यात येणार असल्याचा मानस मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांनी सांगीतले.
रोहन परिचारक म्हणाले, युटोपियन शुगर्सने मागील दहा हंगामात भरीव कामगिरी केली आहे. चालू गळीत हंगामात 6.00 लाख मे.टन ऊसाचे गाळप करणेचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याने पेट्रोलियम कंपन्याकडे 1.00 कोटी लिटर इथेनॉल निर्मितीची निविदा भरलेली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी कारखान्यास ऊसाच्या रसापासुन 40 लाख लिटर व बी हेवी मोलॅसेस पासून 60 लाख लिटर इथेनॉल निर्मिती व पुरवठा करणेस मान्यता दिलेली आहे. ऊसाच्या रसापासुन इथेनॉल निर्मिती करताना 1.30 इतकी रिकव्हरी खर्च होत आहे तसेच बी हेवी मोलॅसेस पासून इथेनॉल निर्मिती करताना 1.35 इतकी रिकव्हरी खर्च होत आहे. इथेनॉल विक्रीच्या मिळणाऱ्या रकमेतुन ऊस उत्पादकांना वेळेत ऊस बिल रक्कम अदा करणे पुढील काळात शक्य होणार आहे. यावेळी कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक, चिफ फायनान्सियल ऑफीसर दिनेश खांडेकर, जनरल मॅनेजर (टेक.) सुधिर गाढवे, डिस्टलरी मॅनेजर महेश निंबाळकर, मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे, चिफ केमिस्ट चंद्रकांत विभुते, सिव्हिल इंजिनिअर अनिल भोसले आदी खातेप्रमुख तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग अभिजीत सुर्यवंशी, मनोज सावंत व कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ई.डी.पी. मॅनेजर अभिजीत यादव यांनी मानले.