
*रामसेतू फाउंडेशन व युती सेना यांच्या वतीने टाकळी सिकंदर येथे विविध स्पर्धा संपन्न!*
(युती सेना राज्य कार्यकारिणी सदस्या प्रियंका ताई परांडे यांचा ग्रामीण भागातील कलागुणांना वाव देण्यास प्रयत्न)
(माझी गृहराज्यमंत्री सिद्धाराम जी म्हेत्रे, महेश नाना साठे, सौ अनिताताई माळगे यांची प्रमुख उपस्थिती)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
काल दि.६ सप्टेंबर २०२५ रोजी श्री. गणेश उत्सवानिमित्त रामसेतू फाउंडेशन तर्फे आणि युवतीसेना राज्य कार्यकरणी सदस्य प्रियांकाताई परांडे सोलापूर यांच्या माध्यमातून टाकळी सिकंदर(मोहोळ)या ठिकाणी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री श्री सिद्धारामजी म्हेत्रे साहेब,सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे,महिला सक्षमीकरण राज्य प्रमुख आणि महिला आघाडी संपर्क प्रमुख सौ.अनिताताई माळगे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.लहान गटामध्ये चित्रकला स्पर्धा,मेहंदी स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा ,खुल्या गटासाठी मेहंदी स्पर्धा, आणि रांगोळी स्पर्धा तसेच महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. लहान गट आणि खुला गट अशा पद्धतीने युवती-महिला आणि विद्यार्थी यांच्यासाठी कलागुनांना वाव मिळावा म्हणून प्रियांकाताई यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या स्पर्धेमध्ये एकूण १६० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.पहिले ३ क्रमांक यांना बक्षीस स्वरूपात रक्कम देण्यात आली आणि मानाची ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला तसेच सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी महिलांसाठी खास हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता.यावेळी महिला सक्षमीकरण साठी सौ अनिताताई माळगे मॅडम यांनी महिलांना स्वतःचा रोजगार निर्माण करण्यासाठी आणि स्वयंसिद्ध बनण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन केले.
तसेच सर्वच मान्यवर यांनी आपले बहुमोल मार्गदर्शन केले.
यावेळी शिवसेना पदाधिकारी
सौ. उषाताई मुळे,युवतीसेना मोहोळ विधानसभा प्रमुख सौ.स्नेहा चवरे,युवा सेना मोहोळ गणेश जाधव,युवासेना तालुका प्रमुख महादेव भोसले,संग्राम चव्हाण सर,राजीव गांधी माध्यमिक विद्यालय संचालक मा.श्री .वीरसेन देशमुख, ग्रा.पं. सदस्य फुलचिंचोली मा.नारायण आबा गायकवाड श्री. सागर सलगर पुळुजवाडी श्री. अजिंक्य सपाटे तारापूर ,माजी नगरसेवक गणेशदास परदेशी,छगन पवार,बाळासाहेब बोबडे,संतोष परांडे,विश्वास वसेकर,शुभम मुळे,नारायण मुळे,आकाश गाडे,प्रमोद बाबर,दत्ता पांढरे व इतर सर्व मान्यवर मंडळी ,पालक ,ग्रामस्थ ,स्पर्धक परीक्षक, निरीक्षक उपस्थित होते.हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व सुवासिनी स्त्रियांना भेटवस्तू देऊन सन्मानित केले गेले .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इंजिनीयर प्रियांका (ताई) परांडे यांनी केले.
