राधानगरी धरण शंभर टक्के भरले धरणाचे स्वयंचलित पाच दरवाजे उघडले ८६४० क्युसेस विसर्ग भोगावती नदीपत्रात बंधारे पाण्याखाली
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर अधिक झाल्याने आज सकाळी धरण पूर्ण क्षमतेनं भरले आहे.गुरुवारी सकाळ पासून धरणाचे ३,४,५,६,७ क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे एकूण पाच उघडले तर, बीओटीवर असणाऱ्या वीज ग्राहतून १५०० क्युसेस व स्वयंचलित गेटमधून ७१४० असा एकूण प्रति सेकंद ८६४० क्युसेस विसर्ग भोगावती नदीपत्रात होत आहे. यामुळे अनेक बंधाऱ्यावर पाणी आले असून पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
आज धरण परिक्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असल्याने धरणाची पाणी पातळी वाढून धरणाच्या सात स्वयंचलित दरवाज्यापैकी सकाळी १० वाजून ०५ मिनिटानी स्वयंचलित द्वार क्रं. ६ उघडले. यातून १४२८ क्यूसेस तर पॉवर हाऊसमधून १५०० क्यूसेस असा २९२८ क्यूसेस विसर्ग सुरू होता. त्यानंतर सकाळी ११.४३ वाजलेपासून ते ४.०० वाजेपर्यंत स्वयंचलित दरवाजे क्रं. ३ व ४ चा उघडला असे एकूण चार दरवाजे खुले झाले होती संध्याकाळी ४.३० वाजता दरवाजा क्र.७ असे पाच दरवाजे खुले असून या सर्व दरवाजांतून ७१४० क्यूसेक आणि पॉवर हाऊसमधून १५०० क्यूसेक असा एकूण ८६४० क्यूसेक विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे.पाणी पातळी-३४७.५१ फूट आजचा पाणीसाठा -८३६४.१० द.ल.घ.फु. सायंकाळी ५ चा पाऊस -७२ मि.मी. १ जून पासून आजअखेर एकूण पाऊस – २९४८ मि.मी. झाला आहे.संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.